DSSSB Recruitment 2024 : 12वी पास तरुणांची होणार ‘या’ पदासाठी निवड; अर्ज प्रक्रियेकडे लक्ष द्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल (DSSSB Recruitment 2024) तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. इच्छुक उमेदवारांनी  वेळ न दवडता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे बारावी पास उमेदवार या पदासाठी पात्र ठरणार आहेत. नुकतीच या बंपर भरतीबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दिल्ली सबऑर्डिनेट सर्विस सिलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. बारावी पास उमेदवार या भरती प्रक्रियासाठी अर्ज करु शकतात. दि. 9 जानेवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट dsssb.delhi.gov.in वर जावे लागले. तिथेच आपल्याला या (DSSSB Recruitment 2024) भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल. ही मोठी बंपर भरती होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दि. 7 फेब्रुवारी 2024 आहे. तर भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com