करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी (SBI PO Prelims Result) ऑफिसर पदासाठी घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर sbi.co.in हा निकाल पाहता येणार आहे. दि. १, ४ आणि ६ नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती आणि जे परीक्षेत बसले होते आणि यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. या भरती अंतर्गत एकूण २००० पदे भरली जाणार आहेत.
या परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले होते. एसबीआय पीओ पूर्व परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार आता मुख्य परीक्षेला बसतील. निकालानंतर प्रवेशपत्र आणि मुख्य परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. मुख्य परिक्षेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांना ग्रुप एक्सरसाइज आणि त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
असा पहा तुमचा निकाल (SBI PO Prelims Result)
1. सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://bank.sbi/careers ला भेट द्यायची आहे.
2. यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर निकाल असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3. येथे मागितलेली सर्व माहिती अचूक भरा.
4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
पूर्व परीक्षेत उतीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. जे उमेदवार मुख्य परीक्षेत पास होतील, त्यांना सायकोमेट्रिक चाचणीसाठी बोलावले जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com