ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद भरतीचा चौथा टप्पा ‘या’ तारखेपासून होतोय सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध (ZP Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी सरळसेवा परीक्षेचा चौथा टप्पा दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 21 संवर्गातील 972 पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागाविण्यात आले होते.

त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेतील विविध पदभरतीसाठी प्रत्यक्ष पदांच्या परीक्षेला दि. 7 ऑक्‍टोबरपासून प्रारंभ झाला आहे. विविध संवर्गासाठी परीक्षेचे आतापर्यंत 3 टप्पे झाले आहेत. परीक्षेच्या चौथ्या टप्प्यास दि. 17 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी दि. 17 व 20 नोव्हेंबर रोजी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा आयटी पार्क गोडोली, कराड येथील महिला महाविद्यालयातील केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com