Satara ZP : सातारा जिल्हा परिषद पद भरती; शनिवारपासून सुरु होणार परीक्षा; 8 संवर्गातील पदे भरणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्हा परिषद भरती प्रक्रिया (Satara ZP) गेल्या अनेक दिवसांपासून रखडली होती. या रखडलेल्या भरती प्रक्रियेस अखेर मुहुर्त सापडला आहे. शनिवार दि. ७ आॅक्टोबरपासून या प्रक्रियेची प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८ संवर्गासाठी परीक्षा होत असून ती दि. ११ आॅक्टोबरपर्यंत परीक्षा चालणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गातील ९७२ पदाच्या भरतीबाबत पात्र उमदेवारांकडून ५ ते २५ आॅगस्टदरम्यान आॅनलाइन पध्दतीने अर्ज मागणी करण्यात आली होती. या भरतीसाठी ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या भरती प्रक्रियेची परीक्षा शनिवार दि. ७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी परीक्षा होत आहे.

कोणत्या दिवशी कोणता पेपर (Satara ZP)
यामध्ये शनिवार दि. ७ रोजी रिंगमन (दोरखंडवाला) आणि वरिष्ठ सहायक (लेखा) परीक्षा होणार आहे. तर दि. ८ रोजी  विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि दि. १० रोजी विस्तार अधिकारी (कृषी) तसेच आरोग्य पर्यवेक्षकाची परीक्षा होईल. त्याचबरोबर दि. ११ आॅक्टोबर रोजी लघुलेखकाची निम्न आणि उच्चश्रेणी तसेच कनिष्ठ सहायक लेखाची परीक्षा होणार आहे.
या परीक्षेसाठी उमेदवारांना सातारा जिल्हा परिषदेच्या https://www.zpsatara.gov.in/ या संकेतस्थळावरील लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यायचे आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भात एक डेमोलिंकही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

महत्वाची सूचना –
सातारा जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित सूचनांव्यतिरिक्त अन्य अफवांवर विश्वास ठेवू नये. या भरतीच्या अनुषंगाने संकेतस्थळावर वेळोवळी सूचना (Satara ZP) प्रसारित केल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी सातारा जिल्हा परिषद संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी. तसेच उमेदवारांनी समाजविघातकांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com