करिअरनामा ऑनलाईन । उपविभागीय अधिकारी रत्नागिरी (Kotwal Bharti 2023) यांचे कार्यालय, जिल्हा रत्नागिरी अंतर्गत ‘कोतवाल’ पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 32 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांचे कार्यालय, जिल्हा – रत्नागिरी
भरले जाणारे पद – कोतवाल
पद संख्या – 32 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी व संगमेश्वर
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज फी – (Kotwal Bharti 2023)
1. खुला प्रवर्ग – रुपये 600/-
2. आरक्षित/आर्थिक घटक प्रवर्गासाठी – रुपये 500/-
निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 4 थी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. सरळ सेवा भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात https://ratnagiri.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
5. अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत.
6. प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरच ऑनलाईन पध्दतीने भरलेले व विहीत परीक्षा शुल्क असलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील.
7. इतर कोणत्याही प्रकारे परीक्षा फी स्वीकारण्यात येणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com