करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या (8th Scholarship) जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा 10 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 12वीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
काय आहे पात्रता –
1. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे उत्पन्न 3 लाख 50 हजारांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत. राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात.
2. तसेच विद्यार्थी इयत्ता सातवीमध्ये किमान 55 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) मधील विद्यार्थ्यांनी किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला असावा; अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.
3. विनाअनुदानित शाळेत, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे (8th Scholarship) विद्यार्थी आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
4. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इयत्ता नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दहावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, असे ओक यांनी सांगितले.
काही महत्त्वाच्या तारखा – (8th Scholarship)
दि. 23 ऑगस्ट 2023 – ऑनलाइन पद्धतीने अर्जाची शेवटची मुदत
दि. 2 सप्टेंबर 2023 – विलंब शुल्कासहीत अर्ज
दि. 10 डिसेंबर 2023 – परीक्षा
फेब्रुवारी 2024 – परीक्षेचा निकाल
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
https://www.mscepune.in
https://nmmsmsce.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com