करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या (NDA Preperation) सशस्त्र सेनेमध्ये (Indian Armed Forces) जल सेना (Navy) थलसेना (Army) आणि वायुसेनेचा (Airforce) समावेश होतो. भारतीय सेनेत भरती होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न आहे. बाकी करिअर्सच्या तुलनेत सैन्यात भरती झालेल्या लोकांना एक विशेष आदर आणि प्रतिष्ठा मिळत असते तसेच आपल्या देशाप्रती कार्य करण्याची ही एक अनमोल संधी आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय रक्षा अकादमी म्हणजेच NDA (National Defence Academy) तर्फे वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सर्विस सेलेक्शन बोर्ड (SSB) यांच्या तोंडी परीक्षेला उत्तर द्यावे लागते.
एनडीएच्या लेखी तसेच एसएसबीच्या तोंडी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर काही वर्षांसाठी IMA सारख्या ट्रेनिंग अकॅडमी मध्ये निवड झालेल्या तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी तयार केले जाते. हे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर थल सेनेमध्ये(Army) लेफ्टनंट,जल सेनेमध्ये(Navy) सब लेफ्टनंट तर वायुसेनेमध्ये(Airforce )फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली जाते. दोन वर्षांच्या सेवापूर्तीनंतर सैनिकांना थल सेनेत कॅप्टन, जलसेनेत लेफ्टीनंट आणि वायुसेनेत फ्लाईट लेफ्टनंट अशा रँकवर बढती मिळते. जनरल, एडमिरल तसेच एअर चीफ मार्शल ही तीनही या श्रेणीतील उच्च पदे आहेत.
NDA परीक्षेचा अभ्यासक्रम आणि एक्झाम पॅटर्न कसा असतो? (NDA Preperation)
एनडीएच्या परीक्षेची तयारी करत असता यूपीएससीने (UPSC) निर्धारित केलेला अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न सुरुवातीलाच समजून घेणं फार महत्त्वाचा आहे. upsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन NDA Exam Notification वरुन लेटेस्ट एक्झाम पॅटर्नविषयी माहिती मिळू शकते. या परीक्षेत 2.3 तासांचे दोन पेपर द्यावे लागतात, त्यातील पहिला पेपर हा गणिताचा असतो ज्यामध्ये बारावीच्या अभ्यासक्रमातील 120 प्रश्न विचारले जातात. दुसरा पेपर हा जनरल अबिलिटी टेस्ट (GAT) या विषयाचा असतो ज्यामध्ये 150 प्रश्न विचारले जातात. या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग देखील असते.
या परीक्षेची तयारी कशी कराल?
1. कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य नियोजन असणे फार महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रम आणि एक्झाम पॅटर्न व्यवस्थितपणे समजल्यानंतर एक स्टडी प्लॅन तयार करावा ज्यामध्ये आपल्या वेळेनुसार पूर्ण अभ्यासक्रम सामावला जाऊ शकतो.
2. एखादी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्यातील कन्सेप्ट योग्यरित्या माहीत असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे एनडीएच्या परीक्षा देताना सुद्धा अभ्यासक्रमातील प्रत्येक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजली पाहिजे. अडचण आल्यास कोचिंग क्लासेस ची मदत घेता येते, तसेच ऑनलाईन दुनियेत इंटरनेटवरून (NDA Preperation) स्पेशल सेशन चालवली जातात.
3. परीक्षा देताना मागील काही वर्षांचा आढावा घेतला पाहिजे. गेल्या पाच वर्षात घेतल्या गेलेल्या परीक्षा आणि यूपीएससीद्वारे घोषित केलेली गुण पाहून कट ऑफ लिस्ट तयार करावी यामुळे किमान किती अंक प्राप्त केल्यानंतर आपली निवड होऊ शकते हे ठरवता येईल.
4. एनडीएच्या परीक्षेत जनरल अबिलिटी टेस्ट(GAT) ची देखील विशेष तयारी करावी लागते गणिताचा पेपर पेक्षा जीएटीला जास्त गुण दर्शवलेले आहेत त्यामुळेयामध्ये इंग्रजी, जनरल नॉलेज आणि सायन्स सारख्या विषयांची आखणी करुन तयारी करावी लागते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com