MU Exam : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ‘या’ तारखांना; अतिवृष्टीमुळे रद्द झाल्या होत्या परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी (MU Exam) एक मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या 20 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या या परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ही आहे परीक्षेची तारीख (MU Exam)
मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग या मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 20 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या शासन आदेशानुसार आणि रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 20 जुलैच्या सर्व 9 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यातील तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या परीक्षा 26 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील; याची (MU Exam) विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे.
तसेच एमएससी (फायनान्स) सत्र 2, एमएससी व एमएमसी ( रिसर्च ) सत्र 2, एमएससी आयटी व सीएस (60:40 आणि 75:5), एमएससी गणित (80:20) सत्र 2, एमएससी आणि एमएमसी ( रिसर्च ) सत्र 3, एमसीए सत्र 1, एमए (ऑनर्स) आणि एम कॉम (60:40) सत्र 4 या अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 31 जुलै 2023 रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील.

तृतीय वर्ष बीए सत्र 5 च्या 26 जुलैच्या परीक्षा 28 जुलै रोजी होणार आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र 5 मधील प्रोग्राम क्रमांक 3A00135 आणि 3A00145 च्या दिनांक 26 जुलै 2023 च्या (MU Exam) सर्व परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव दिनांक 28 जुलै रोजी होणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com