CUET Result 2023 : CUETचा निकाल जाहीर; इथे पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय विद्यापीठ सामाईक (CUET Result 2023) प्रवेश परीक्षा म्हणजेच CUETचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठांसह सहभागी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आपल्या वेबसाईटवर हा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेचा निकाल cuet.samarth.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डल वरुन दिली आहे.

केंद्रीय, राज्य, अभिमत आणि इतर सहभागी खाजगी विद्यापीठे, स्वायत्त (CUET Result 2023) संस्थांच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील सीयुईटी प्रवेश परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी म्हणजे 2022 पासून याची सुरवात करण्यात आली होती.
यावर्षी परीक्षेला सुमारे 14 लाख 90 हजार उमेदवारांनी (CUET Result 2023) नोंदणी केली होती, तर 13 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. उमेदवारांसाठी 29 जून ते 1 जुलै या कालावधीत उत्तरतालीका प्रसिद्ध करण्यात आली होती. यावेळी सुमारे 25 हजार 782 आव्हाने प्राप्त झाली होती. एनटीएने काही दिवसांसाठी दररोज रात्री सुधारित तात्पुरती उत्तरे प्रसिध्द केली होती. त्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com