ICAI CA Final Result 2023 : ICAI CA परीक्षेचा निकाल जाहीर!! पहा निकालाची टक्केवारी; इथे आहे डायरेक्ट लिंक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Final Result 2023) ऑफ इंडियानं अखेर CA इंटरमीजीएट आणि फायनल परीक्षा 2023 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. ICAI CA इंटर आणि फायनल परीक्षा मे 2023 मध्ये घेण्यात आली होती.

CA फायनल परीक्षेच्या पात्रता निकषांनुसार, पात्र होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% आणि एकूण 50% गुण मिळणे आवश्यक आहेत. सीए इंटर परीक्षेच्या दोन्ही (ICAI CA Final Result 2023) गटात एकूण 10.24 टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. तर, CA अंतिम गट 1 आणि गट 2 च्या परीक्षेला बसलेल्या 25,841 उमेदवारांपैकी केवळ 2,152 उमेदवार यशस्वी झाले आहेत आणि उत्तीर्णतेची टक्केवारी 8.33 टक्के आहे. ICAI CA अंतिम परीक्षा गट 1 साठी 2 ते 9 मे आणि गट 2 साठी 11 ते 17 मे दरम्यान घेण्यात आली. आणि इंटरमिजिएट परीक्षा गट 1 साठी 3 ते 10 मे आणि गट 2 साठी 12 ते 18 मे दरम्यान घेण्यात आली.

निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो – (ICAI CA Final Result 2023)
1. सर्वप्रथम ICAI ची अधिकृत वेबसाईट icai.nic.in ला भेट द्या.
2. CA इंटरमीडिएट निकाल पर्यायावर क्लिक करा.
3. तुमचा ICAI नोंदणी क्रमांक/पिन आणि रोल नंबर वापरून लॉगिन करा.
4. कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा.
5. CA इंटरचा निकाल मे 2023 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
6. उमेदवार त्यांचे गुण तपासू शकतात आणि जून सत्रासाठी सीए इंटरमिजिएट निकाल डाउनलोड करू शकतात.
7. भविष्यातील संदर्भासाठी CA इंटरमिजिएट 2023 च्या निकालाची प्रिंट घ्या.

हर्ष चौधरीने नोव्हेंबर 2022 मध्ये CA अंतिम परिक्षेत ऑल इंडिया रँक 1 मिळवला. त्याला 700 पैकी 618 गुण मिळाले. अ गटाच्या परीक्षेत एकूण 65,291 उमेदवार बसले, त्यापैकी 13,969 उमेदवार (ICAI CA Final Result 2023) यशस्वी झाले. तर 64,775 उमेदवारांनी गट ब परीक्षेला बसले होते, त्यापैकी 12,053 परीक्षा उत्तीर्ण झाले. दोन्ही गटांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 11.09 टक्के इतकी नोंदवली गेली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com