करिअरनामा ऑनलाईन । पश्चिमी रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) जाहिरात जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध विभागातील अप्रेन्टिस पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 27 जून 2023 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2023 आहे.
संस्था – पश्चिमी रेल्वे (Western Railway)
भरले जाणारे पद – अप्रेन्टिस
अप्रेन्टिस फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (डीएसएल), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), लघुलेखक (इंग्रजी)}.
पद संख्या – 3624 पदे (Railway Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
1. उमेदवारांनी एकूण 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.
2. तसंच NCVT/SCVT शी संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेमधून संबंधित पदांनुसार ITI प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume
2. शैक्षणिक प्रमाणपत्र (Railway Recruitment 2023)
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com