करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ठाणे (Job Notification) महानगरपालिका, ठाणे अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ठाणे महानगरपालिका, ठाणे
भरले जाणारे पद –
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 19 पदे
2. औषध निर्माता – 8 पदे
3. क्ष-किरण तंत्रज्ञ – 1 पद
पद संख्या – 28 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)– ४००६०२
नोकरी करण्याचे ठिकाण – ठाणे
वय मर्यादा – (Job Notification)
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
2. औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ – 65 वर्षे
अर्ज फी –
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. 150/-
2. राखीव प्रवर्गातील उमेद्वार्ण्कारिता – रु. 100/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 जुन 2023
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS Preference To Clinical Experience In Gov. And/ Or Private Sector & MCI Registration अनुभव असल्यास प्राधान्य.
2. औषध निर्माता – D–PHARMA / B PHARMA Preference To Clinical Experience In Gov. And/ Or Private Sector & Maharashtra pharmacy council अनुभव असल्यास प्राधान्य.
3. क्ष-किरण तंत्रज्ञ – 10+2 WITH DIPLOMA IN RADIOLOGY OR X–RAY (RELEVANT APPROVED UNIVERSITY BY UGC)
मिळणारे वेतन –
1. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- दरमहा
2. औषध निर्माता Rs. 19,584/- दरमहा
3. क्ष-किरण तंत्रज्ञ Rs. 17,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. (Job Notification)
3. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
4. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
5. गुगल फॉर्म परीपुर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी.
6. पुर्ण भरलेल्या गुगल फॉर्मची स्वसाक्षांकित प्रत व (ट) मधील मुद्दा क्र. 7 नुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- 400602 येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात किंवा कुरीअरने सादर करायचे आहेत.
7. मुदतीनंतर सादर करण्यात येणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
8. गुगल फॉर्मचा अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे.
9. अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगलफॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे –
फॉर्म भरल्यावर उमेदवारांनी सोबत खालील कागदपत्रे जोडायची आहेत.
1. पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट
2. वयाचा पुरावा
3. पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
4. गुणपत्रिका
5. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
6. शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
7. जात वैधता प्रमाणपत्र
8. आवश्यकतेनुसार नॉन – क्रिमीलेअर
9. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
10. आधारकार्ड
11. पॅन कार्ड (Job Notification)
12. सध्याचा फोटो
13. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
14. वाहन चालविण्याचा परवाना
15. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
16. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
17. युनियन बँकेचा Demand Draft
(महत्वाचे – अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.)
काही महत्वाच्या लिंक्स – (Job Notification)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com