करिअरनामा ऑनलाईन । MBBS चा फुल फॉर्म म्हणजे बॅचलर (NEET UG 2023) ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी. MBBS हे लॅटिन वाक्यांश Medicinae Baccalaureus Baccalaureus Chirurgiae वरून आले आहे. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनून लोकांची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी MBBS हा 5.5 वर्षांचा अंडरग्रेजुएट मेडिकल डिग्री कार्यक्रम आहे. एमबीबीएस ही एक व्यावसायिक पदवी आहे जी डॉक्टर होण्यासाठी, रुग्णांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, औषध लिहून देण्यासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असते.
मेडिकल महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या NEET UG 2023 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नीट परीक्षेला बसणाऱ्या (NEET UG 2023) उमेदवारांची संख्या दरवर्षी वाढत आहे. यंदाही नीट यूजी परीक्षेत 11 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेनंतर सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरु होते. आज आपण भारतामध्ये वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या टॉप 10 कॉलेजेसविषयी जाणून घेणार आहोत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखिल भारतीय स्तरावरील तसेच राज्यनिहाय आणि अभ्यासक्रमानुसार महाविद्यालयांना क्रमवारी दिली आहे. NIRF रँकिंग 2023 मध्ये, AIIMS दिल्लीला देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे. गेल्या वर्षीही एम्स, दिल्ली पहिल्या क्रमांकावर होते. जर तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे.
1. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे NIRF रँकिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मदत करते. त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या विविध पैलूंची माहिती मिळणे (NEET UG 2023) सोपे होते. यावर्षी एम्स दिल्ली 94.32 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी एम्स दिल्ली91.60 गुणांसह पहिल्या क्रमांकावर होती.
2. चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चला दुसरा क्रमांक (चंदीगड मेडिकल कॉलेज) देण्यात आला आहे. त्याचा स्कोअर 81.10 आहे. गेल्या वर्षी PGIMER चंदीगड 79.00 गुणांसह त्याच स्थानावर होते.
3. तमिळनाडूतील वेल्लोर येथे असलेले ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हे दक्षिण भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. NIRF रँकिंग 2023 मध्ये CMC तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कॉलेजचा स्कोअर 75.29 आहे. गेल्या वर्षी हेच कॉलेज 72.84 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.
4. कर्नाटकातील बेंगळुरू येथील नॅशनल (NEET UG 2023) इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विविध पॅरामीटर्स लक्षात घेऊन त्याचा स्कोअर 72.46 निश्चित करण्यात आला आहे. 2022 मध्ये, निम्हन्सला त्याच रँकवर 71.56 गुण मिळाले होते.
5. पुद्दुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चला 5 वा क्रमांक मिळाला आहे. या कॉलेजचा स्कोअर 72.10 आहे. गेल्या वर्षी ही संस्था 67.64 गुणांसह 6व्या क्रमांकावर होती.
6. तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे असलेल्या अमृता विश्व विद्यापीठाला NIRF रँकिंग 2023 (भारतातील शीर्ष वैद्यकीय महाविद्यालये) मध्ये 6 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. या कॉलेजचा स्कोअर 70.84 आहे. गेल्या वर्षी हे कॉलेज 66.49 गुणांसह 8व्या क्रमांकावर होते.
7. संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्था लखनौ, उत्तर प्रदेश येथे स्थित आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या क्रमवारीत ते 7 व्या स्थानावर आहे. या कॉलेजचा स्कोअर 69.62 आहे. गेल्यावर्षी हे कॉलेज 67.18 च्या स्कोअरसह याच रँकवर होते.
8. जगप्रसिद्ध बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, उत्तर प्रदेश येथे आहे. त्यांच्या मेडिकल (NEET UG 2023) कॉलेजला 8 वा क्रमांक मिळाला आहे. या कॉलेजचा स्कोअर 68.75 आहे. गेल्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठ 68.12 गुणांसह पाचव्या क्रमांकावर होते.
9. कर्नाटकातील मणिपाल येथे असलेल्या कस्तुरबा मेडिकल कॉलेजला 2023 च्या क्रमवारीत 9व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. या कॉलेजचा स्कोअर 66.19 आहे. गेल्या वर्षी हे वैद्यकीय महाविद्यालय 63.89 गुणांसह 10व्या क्रमांकावर होते.
10. श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (NEET UG 2023) हे केरळमधील तिरुवनंतपुरम येथे आहे. 65.24 गुणांसह ते 10 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी ही संस्था 65.17 गुणांसह 9व्या स्थानावर होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com