करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासन, महिला व बाल (Anganwadi Bharti 2023) विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पश्चिम या प्रकल्पांतर्गत रिक्त असलेली ‘अंगणवाडी मदतनिस पदे’ भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
संस्था – महाराष्ट्र शासन, महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) सातारा पश्चिम प्रकल्प
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 59 पदे (Anganwadi Bharti 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) सातारा पश्चिम, केदार बिल्डींग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर, सदर बझार, सातारा 415001
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – (Anganwadi Bharti 2023)
1. कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षे
2. विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे राहील.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – रुपये 5500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा. ( अर्जात खाडाखोड / गिरवागिरव करू नये. तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये; असे अर्ज रद्द करण्यात येतील.)
3. अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अर्ज सादर केलेनंतर कोणतेही कागदपत्र / प्रमाणपत्र घेतले जाणार नाही. (Anganwadi Bharti 2023)
4. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकीत केलेल्या असाव्यात.
5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (Anganwadi Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com