ITI Courses : ITI ला आहे चांगला स्कोप; 10वी पास/नापास करु शकतात कोर्स; इथं आहे ऍडमिशनचं वेळापत्रक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी पास किंवा नापास असणाऱ्या (ITI Courses) विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने कौशल्य विकास आधारावर अनेक नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे. राज्यात नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कमी वेळात आपले कौशल्य विकसित करून आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसावी, असा सर्वसामान्य वर्गातील तरुणांचा उद्देश असतो. त्यासाठीच ते औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कोर्सकडे वळतात. या कोर्सेसच्या माध्यमातून ते आपले भविष्य घडवतात. अशा विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात  झाली असून त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

नापास विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी
तुम्ही दहावी पास झाला असाल किंवा नापास असाल (ITI Courses) तरी तुम्हाला आयटीआयला प्रवेश घेता येवू शकतो. दि. 12 जून 2023 पासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर पहिली गुणवत्ता यादी ही दि. 20 जुलैला जाहीर होणार आहे.
वय मर्यादा – प्रवेशासाठी येणारा उमेदवार हा 14 वर्षावरील असावा. विद्यार्थ्याकडे 10वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता असावी.
अर्ज करण्यासाठी लिंक – https://admission.dvet.gov.in विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे.

ITI प्रवेशाचे वेळापत्रक – (ITI Courses)
1. ऑनलाइन अर्जाची सुरवात – 12 जून ते 11 जुलै
2. पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम – 19 जून ते 12 जुलै
3. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 16 जुलै
4. पहिली प्रवेश फेरी 20 जुलै :
5. द्वितीय प्रवेश फेरी : 31 जुलै (ITI Courses)
6. दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : 1 ते 4 ऑगस्ट
7. तिसरी प्रवेश फेरी : 9 ऑगस्ट
8. चौथी प्रवेश फेरी : 20 ऑगस्ट
एकूण 82 प्रकारचे अभ्यासक्रम
‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण 82 प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर मशीन आणि वेल्डिंग या (ITI Courses) कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे 100 टक्के प्रवेश हाऊसफुल होतात. वेळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकाचे पालन करायचे आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com