करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुणांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न (MBBS Education) लहानपणापासून पाहिलेलं असतं. डॉक्टर होण्यासाठी अनेकजण MBBSची तयारी करत असतात. विद्यार्थ्यांच्या तुलनेत देशात मेडीकल कॉलेजची संख्या कमी आहे; परिणामी मेडीकलच्या जागा कमी असल्याने प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्यामुळे मेडीकलच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कॉलेज मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता मेडीकल कॉलेजांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज आपण पाहणार आहोत नेमकी किती मेडीकल कॉलेजेसना सरकारने मंजूरी दिली आहे…
किती कॉलेजेसना मिळाली मान्यता (MBBS Education)
देशातील मेडीकल कॉलेजच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे एमबीबीएस बनण्यासाठी NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. देशात आता 50 नविन मेडीकल कॉलेज सुरु होणर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यासाठी मंजूरी दिली आहे. आता मेडीकलच्या (MBBS Education) जागांमध्ये वाढ होणार आहे. देशात आता एकूण मेडीकलच्या कॉलेजांची संख्या 702 झाली आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या जागांची संख्या आता 1,07,658 इतकी झाली आहे.
‘या’ राज्यात होणार नवीन मेडीकल कॉलेज
देशात 50 नवीन मेडीकल कॉलेजेसना परवानगी (MBBS Education) देण्यात आली आहे. यातील तेलंगणात 13 मेडीकल कॉलेज, राजस्थानात आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 5, महाराष्ट्रामध्ये 4, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात राज्यात प्रत्येकी 3 मेडीकल कॉलेज, हरीयाणा, ओडीशा आणि जम्मू – कश्मीरमध्ये प्रत्येकी 2, आणि मध्य प्रदेश आणि नागालॅंडमध्ये प्रत्येकी 1 इतक्या मेडीकल कॉलेजचा समावेश आहे.
NEETचा निकाल लवकरच
दरम्यान NEET परीक्षेचा निकाल लवकरच लागणार (MBBS Education) आहे, उत्तर पत्रिका याआधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. आता यानंतर लवकरच निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. त्यानंतर काऊन्सिलींग प्रक्रिया सुरू होणार आहे. नीट काऊन्सिलींगची माहीती अधिकृत वेबसाईटवर दिली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com