करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (SSC Results 2023) शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट हाती आली आहे. बोर्डाकडून अजून निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा झाली नाही पण निकालाच्या संभाव्य तारखेविषयी माहिती मिळाली आहे. येत्या 7 जूनच्या आधी निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील 10 वी चे विद्यार्थी आणि पालक या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होणार (SSC Results 2023) आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल 7 जून पर्यंत जारी केला जाईल; अशी माहिती मिळत आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट –
1. mahahsscboard.in
2. mahresult.nic.in
असा पहा 10वी चा निकाल – (SSC Results 2023)
1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर लॉग इन करा.
2. महाराष्ट्र SSC निकाल 2023 या लिंकवर जा.
3. तुमचा Seat Number आणि तुमच्या आईचे नाव टाईप करा.
4. लॉगिन करा आणि तुमचा 10 वी चा निकाल तपासा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com