करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेने रिक्त पदांच्या (BMC Recruitment 2023) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी सहायक पदाच्या तब्बल 1178 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.
संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – कार्यकारी सहायक (Executive Assistant)
पद संख्या – 1178 पदे (BMC Recruitment 2023)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज फी – (BMC Recruitment 2023)
खुला प्रवर्गाकरिता – Rs. 1000/-
मागास प्रवर्गाकरिता – Rs. 900/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
2. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
3. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. (BMC Recruitment 2023)
4. उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
मिळणारे वेतन – 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये दरमहा
असा करा अर्ज – (BMC Recruitment 2023)
अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचा आहे.
उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com