HSC Result 2023 : प्रतीक्षा संपली!! 12 वीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता होणार जाहीर; इथे पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (HSC Result 2023) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल उद्या दि. 25 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्सुकता पहायला मिळत होती.
या अधिकृत वेबसाईटवर पहा निकाल – (HSC Result 2023)
1. mahresult.nic.in
2. https://hsc.mahresults.org.in
3. http://hscresult.mkcl.org (HSC Result 2023)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा घेतली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात आली. यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबवण्यात आला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी (HSC Result 2023) प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे दि. 25 मे रोजी दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com