करिअरनामा ऑनलाईन । भारतासह जगभरात मोठ्या (Dr. Babasaheb Aambedkar) उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. या जयंतीला ‘आंबेडकर जयंती’ किंवा ‘भीम जयंती’ म्हणून ओळखले जाते. आंबेडकर हे आपल्या देशातील आघाडीचे आणि महान समाजकार्य केलेले महापुरुष म्हणून ओळखले जातात. आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांच्याबद्दलची काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानुसार जागतिक दर्जाचे वकील, समाजसुधारक आणि प्रथम क्रमांकाचे जागतिक दर्जाचे विद्वान होते. भारतातील दलित बौद्ध चळवळीचे प्रेरक शक्ती म्हणून त्यांना श्रेय देण्यात येतं. आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू म्हणजे आताच्या मध्य प्रदेशातील एका गरीब कुटुंबात झाला होता. तर त्यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाला.
डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी – (Dr. Babasaheb Aambedkar)
जन्म तारीख – 14 एप्रिल 1891
जन्म स्थान – महू, मध्य प्रदेश (आता त्याला डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं)
मृत्यू – 6 डिसेंबर 1956 ( 65 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.)
राष्ट्रीयत्व – भारतीय
आंबेडकरांच्या वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ
आईचे नाव – भीमाबाई
पत्नी – रमाबाई आंबेडकर आणि डॉ. सविता आंबेडकर आंबेडकरांची दोन लग्न झाली होती.
मुलगा – यशवंत भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Aambedkar)
नातू – प्रकाश आंबेडकर
आंबेडकरांच्या शैक्षणिक पदव्या –
1. मुंबई विद्यापीठ (बीए), कोलंबिया विद्यापीठ (एमए, पीएचडी, एलएलडी), लंडन
2. स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (एमएससी, डीएससी), ग्रेज इन (बॅरिस्टर-एट-लॉ)
3. पुरस्कार/सन्मान – बोधिसत्व (१९५६), भारतरत्न (१९९०), प्रथम कोलंबियन अहेड ऑफ देयर टाईम (२००४), द ग्रेटेस्ट इंडियन (२०१२)
आंबेडकरांचे राजकीय पक्ष – शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन, स्वतंत्र मजूर पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
सामाजिक संघटना – बहिष्कृत हितकारिणी सभा, समता सैनिक दल (Dr. Babasaheb Aambedkar)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार – (Dr. Babasaheb Aambedkar)
1. मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो.
2. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मापन त्यानुसार करतो जितकी तिथल्या महिलांनी प्रगती केली असेल.
3. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.
4. शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. (Dr. Babasaheb Aambedkar)
5. धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही.
6. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते, जसे वनस्पतीला पाण्याची गरज असते, अन्यथा ती कोमेजून मरते.
7. महापुरुष हा प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असा असतो की, तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो.
8. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ती एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारली पाहिजे.
9. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. (Dr. Babasaheb Aambedkar)
10. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ते एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com