UGC NET Result : UGC NET चा निकाल आज होणार जाहीर; निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । NET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक (UGC NET Result) महत्वाची अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या UGC NET परीक्षेचा निकाल आज 13 एप्रिल 2023 रोजी जाहीर होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGCचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. UGC NET 2023 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाणार आहे. हा निकाल नक्की कसा चेक करायचा याची माहिती जाणून घेवूया…
UGC NET परीक्षा यावर्षी डिसेंबर 2021 आणि जून 2022 सायकलसाठी एकाच वेळी घेण्यात आली. UGC NET प्रवेश परीक्षा 21 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत 5 टप्प्यांत घेण्यात आली. यामध्ये 83 विषयांसाठी एकूण 08 लाख 34 हजार 537 उमेदवार बसले होते.

निकाल जाहीर करण्यासाठी यूजीसी किंवा नॅशनल टेस्टिंग (UGC NET Result) एजन्सीने वेबसाइट सुरू केली आहे. UGC NET डिसेंबर 2022 चा निकाल ugcnet.nta.nic.in आणि ntaresuts.nic.in वर प्रसिद्ध केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर, आपण खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहू शकता.
असा चेक करा निकाल –
1. निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जा.
2. होमपेजवर, ‘उमेदवार कॉर्नर’ वर जा.
3. आता, UGC NET डिसेंबर 2022 निकाल लिंकवर क्लिक करा.
4. एक नवीन पृष्ठ उघडेल, तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉग इन करा.
5. तुमचा NET निकाल स्क्रीनवर दिसेल.
6. डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.

यावर्षी, यूजीसी नेट परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरातील 186 शहरांमधील 663 केंद्रांवर घेण्यात आली. UGC NET पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये, 150 वस्तुनिष्ठ (UGC NET Result) प्रकारचे प्रश्न एकूण 300 गुणांसाठी विचारले जातात आणि ते सोडवण्यासाठी 3 तास दिले जातात. NET परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख तपासता येईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com