Government Jobs : 4 थी पास उमेदवारांना मुंबई High Court मध्ये Job ची संधी; 47 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिक्त पदांच्या (Government Jobs) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून चौथी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 27 मार्च 2023 रोजी होणार आहे.

संस्था – मुंबई हाय कोर्ट, मुंबई

भरले जाणारे पद – स्वयंपाकी / Cook

पद संख्या – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा.

2. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पूरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – (Government Jobs)

10 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते कमाल 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा फी – 200/- रुपये

मिळणारे वेतन – 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये दरमहा आणि इतर भत्ते

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत (Government Jobs)

मुलाखत तारीख – 27 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001.

भरतीसंदर्भात सूचना – 

1. उमेदवार करार करण्यास सक्षम असावा/ असावी. त्याला / तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला तिला कोणत्याही न्यायालय / एम.पी.एस.सी. / यु.पी.एस.सी. किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडींमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे.

2. त्याला / तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या /तिच्याविरूध्द फौजदारी खटला प्रलंबित नसावा. (Government Jobs)

3. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांचेवर कोणतीही विभागीय चौकशी नसावी.
महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ नुसार, उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 205 व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे, हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.

आवश्यक कागदपत्रे –

1. जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला
2. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक
3. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र
4. जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे (कमीत कमी ५ वर्षांपासून ओळखत असल्याबाबतचे प्रमाणपत्र ( त्यांचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर सह) (जाहीरातीसोबत परिशिष्ट ‘ब’ नमुन्यात)
5. स्वयंपाक कामाचा अनुभवाचा दाखला (Government Jobs)

6. स्वयंपाकाचा विशेषतेसंबंधीचा दाखला (असल्यास)
7. सक्षम अधिका-याने प्रदान केलेला जातीचा दाखला
8. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
9. अर्जदाराने त्याला बनवता येणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी सोबत जोडावी
10.  उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला
11. विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला
12. सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी

काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com