Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी-आशा सेविकांना अच्छे दिन!! तुमच्या मानधनात होणार ‘इतकी’ वाढ

Maharashtra Budget 2023
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Maharashtra Budget 2023) आज विधानभवनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी अंगणवाडी आणि आशा सेविकांना मोठा दिलासा देत त्यांच्या मानधनात वाढ केल्याची घोषणा केली आहे. तसेच अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची एकूण 20 हजार पदे भरणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली.

सध्या राज्यातील आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन हे 3 हजार 5000 रुपये आहे. तर गटप्रवर्तकांचे सध्याचे मानधन हे 4 हजार 700 रुपये एवढे आहे. या मानधनात 1500 रुपये एवढी वाढ करण्यात येत आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली. तसेच अंगणवाडी सेविकांचं (Maharashtra Budget 2023) मानधन हे 8 हजार 325 वरून 10 हजार रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार 975 वरून 7 हजार 200 रुपये करण्यात येत आहे. याशिवाय अंगणवाडी मदतनिसांचे मानधन हे 4425 वरून 5500 रुपये करण्यात आले आहे, अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे.

महिलांसाठी फडणवीस यांच्या घोषणा – (Maharashtra Budget 2023)

  • मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करणार.
  • महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवणार.
  • महिलांना एसटी प्रवास करताना तिकीटात सरसकट 50 टक्के सवलत
  • चौथे सर्व समावेशक महिला धोरण जाहीर करणार (Maharashtra Budget 2023)
  • मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये देणार
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये देणार

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com