करिअरनामा ऑनलाईन । 12 वी च्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या (HSC Exam 2023) आहेत. अजूनही या परीक्षेत गोंधळ सुरु आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले होते त्यामुळे प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. यानंतर आता बीडमध्ये वेगळाच प्रकार घडला आहे. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील प्रश्न पत्रिका देण्यात आल्यामुळे शेवटी इंग्रजी भाषेतील प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करुन विद्यार्थ्यांनी उत्तरे लिहावी लागली. या प्रकारामुळे बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवसांपासून गोंधळ पाहायला (HSC Exam 2023) मिळत आहे. कधी प्रश्न पत्रिकेत उत्तरच छापून आली तर कुठे प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका छापून आल्या. तर बीड जिल्ह्यामध्ये कम्प्युटर टेक्निकलचा पेपर मराठीमध्ये देणाऱ्या विद्यार्थांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्यात आली.
मराठी भाषेमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका पाहून एकच गोंधळ उडाला. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या मुलांच्या हाती इंग्रजीतील प्रश्नपत्रिका पत्रिका पडल्यामुळे विद्यार्थी चांगलेच बुचकुळ्यात पडले.
इंग्रजीचे प्रश्न मराठीत भाषांतर करुन देण्याची केंद्र चालकांवर वेळ (HSC Exam 2023)
काही वेळानंतर परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना ही चूक लक्षात आल्यानंतर इंग्रजी प्रश्नांचे भाषांतर मराठीत करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही वाया गेला. हा गोंधळ पाहून विद्यार्थी चक्रावून गेले. इंग्रजी प्रश्नांचे रूपांतर मराठी प्रश्नांमध्ये केल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला.
बोर्डाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर
यंदाच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यापासूनच बोर्डाचा या ना त्या कारणाने पेपर मधील गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मराठीत परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना चक्क (HSC Exam 2023) इंग्रजीमध्ये पेपर आल्याने तसेच इंग्रजीमध्ये आलेला पेपर मराठीत भाषांतर करून देण्याची वेळ तेथील शिक्षकांवर आल्याने बोर्डाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
परीक्षा विभाग गाफील
अनेक वेळा बोर्डाच्या पेपर मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. असं असलं तरी परीक्षा विभाग मात्र पूर्णपणे डोळे झाक करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी जेव्हा अशा त्रुटी आढळून येत आहेत. त्यावेळी ह्या त्रुटी सुधारणा गरजेचे असतं. मात्र, या त्रुटी सुधारणा होत (HSC Exam 2023) नसल्यामुळे पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या चुका बोर्डांच्या पेपरमध्ये होताना दिसत आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल देखील पालक आणि विद्यार्थी विचारत आहेत एकूणच चांगली परीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी बोर्डाकडून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे; असं मत व्यक्त केले जात आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com