Salary Increment : जागतिक मंदीची ऐशी तैशी!! भारतीयांसाठी गुड न्यूज; कंपन्या तुमचा पगार वाढवणार; वाचा किती?

Salary Increment
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 2023 चे आर्थिक वर्ष लवकरच संपणार आहे (Salary Increment) आणि कंपन्यांनी पगार वाढीची प्रक्रिया सुरु केली आहे. जागतिक पातळीवर अस्थिरता असली तरी यंदा भारतीयांच्या पगारात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करु शकतात. त्यामुळे यंदा कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले होणार आहे. आता कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला असेल की, त्यांच्या पगारात किती वाढ होईल? काही एजन्सीज दरवर्षी अनेक कंपन्यांमध्ये सर्व्हे करतात. त्याआधारे कोणत्या क्षेत्रातील कंपन्या किती पगारवाढ करणार आहेत याचा अंदाज बांधण्यात येतो. व्यावसायिक सेवा देणारी संस्था एओन इंडियाने (Aon India) याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. कंपनीच्या मते, यंदा भारतीय कंपन्या सरासरी 10.3 टक्क्यांची पगारवाढ देतील. जागतिक मंदीचे कारण असले तरी भारतीयांना चांगले इन्क्रिमेंट मिळेल. कोणत्याही परिस्थितीत कंपन्या ब्रेन ड्रेन होणार नाही, चांगले कर्मचारी पगारासाठी दुसरीकडे जाणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.

कर्मचाऱ्यांची पळवापळवी

काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 21.4 टक्के पळवापळवी झाली आहे. टॅलेंट स्ट्रॅटेजीमध्ये मोठा बदल झाला आहे. पुरवठा साखळीत तफावत झाल्यामुळे कंपन्यांनी दुहेरी अंकी वेतनवाढ केली आहे. त्यामुळे कंपन्यांमध्ये दोन अंकी पगारवाढ होईल, असा दावा एओन इंडियाने केला आहे.

वाढती आर्थिक अनिश्चितता, आर्थिक अस्थिरता यामुळे गेल्या दोन वर्षांपासून पगारवाढीचा मुद्दा ऐरणीवर नव्हता. यंदाही या बाबींचा इन्क्रिमेंटवर परिणाम होईल. अशा परिस्थितीत (Salary Increment) मागील दोन वर्षांत भारतीय कंपन्यांनी चांगली पगार वाढ दिली होती. तर काही कंपन्यांना वाढत्या खर्चाला आळा घालायचा होता. वर्ष 2020 आणि 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे पगार वाढ देण्यात आली नाही.

दोन अंकी पगारवाढ (Salary Increment)

एओनच्या रिपोर्टनुसार, जवळपास 46 टक्के भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना दोन अंकी पगार वाढ देण्याच्या तयारीत आहेत. 2022 मध्ये कंपन्या सरासरी 10.6 टक्के पगारवाढ देण्यात आली होती. त्यामुळे कर्मचारी जाम खूश झाले होते. यंदाही कर्मचाऱ्यांना जोरदार वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. महागाईशी सामना करण्यासाठी ही रक्कम बुस्टर डोस ठरणार आहे. त्यामुळे महागाईपासून सूटकेसाठी ही पगारवाढ फायद्याची ठरणार आहे.

सर्व्हे काय सांगतो

एओनने या अभ्यासासाठी 40 क्षेत्रातील जवळपास 1400 कंपन्यांच्या आकड्यांचे विश्लेषण केले. एचआर आणि व्यवस्थापनातील दिग्गजांशी, तज्ज्ञांशी (Salary Increment) चर्चा केली. सर्व्हेनुसार, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म्स आणि प्रोडक्टस तयार करणाऱ्या कंपन्या यावर्षी सरासरी 10.9 टक्के इन्क्रिमेंट करतील. कुशल मनुष्यबळ टिकवून ठेवण्यावर कंपन्या जोर देत आहेत. तसेच त्यांना कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडे जाऊ द्यायचे नाहीत.

‘या’ क्षेत्रात चांगल्या पगारवाढीची शक्यता

या रिपोर्टनुसार, तंत्रज्ञान आणि उत्पादनांशी संबंधित कंपन्याकडून 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील पगार सरासरी 10.9 टक्क्यांनी (Salary Increment) वाढतील. अलीकडेच विप्रोने फ्रेशर्सना दिलेली पगाराची ऑफर कमी केल्यावर हा रिपोर्च समोर आला आहे. घरी बसण्यापेक्षा कमी पगारात काम करण्याची ऑफर विप्रो कंपनीने फ्रेशर्सना दिली. कंपनीने वार्षिक ऑफर 6.5 लाख रुपयांवरून 3.5 लाख रुपये करण्यात आली आहे.

काही कंपन्यांनी इन्क्रिमेंटच्या पंरपरेला फाटा दिला आहे. फ्लिपकार्टसह काही कर्मचाऱ्यांना पगार वाढीला यंदा नकारघंटा दिली आहे. तर काही कंपन्यांनी मोठी पगारवाढ न (Salary Increment) देता मध्यममार्ग निवडला आहे. या कंपन्या इतर सोयी-सुविधा वाढविण्यावर भर देत आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com