करिअरनामा ऑनलाईन । माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (HSC Exam 2023) मंडळातर्फे बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. प्रश्नपत्रिकांच्या पेट्या परिरक्षक कार्यालयात पोहचविण्याची प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर असणार आहे. शिक्षण मंडळाने परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडावी, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
कोरोना काळानंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून 2 लाख 60 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रे म्हणून 654 उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये निश्चित करण्यात आली आहेत. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून (HSC Exam 2023) परिरक्षक कार्यालयात (कस्टडी) प्रश्नपत्रिका पोहचविण्याची प्रक्रिया रविवारी उशिरापर्यंत सुरू होती. निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. सकाळी 10:30 व दुपारी 02:30 नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नसणे अशा काही बदलांसह विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
करोनानंतर दोन वर्षांनी नियमित पद्धतीने परीक्षा होत आहे. ऑनलाइन शिक्षणात अनेक विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला. हे लक्षात घेऊन राज्यातील शाळा, महाविद्यालय स्तरावर सराव परीक्षांवर अधिक भर देण्यात आला.
प्रश्न होणार जीपीएस ट्रॅकिंग (HSC Exam 2023)
परीक्षेतील प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार आहे. सहायक परिरक्षकावर त्याची जबाबदारी असणार आहे. याद्वारे परिरक्षक कार्यालयातून प्रश्नपत्रिका केव्हा स्वीकारली, परीक्षा केंद्रांवर केव्हा प्रश्नपत्रिका पोहचल्या याचे ट्रॅकिंग होणार आहे. परीक्षा कक्षात प्रश्नपत्रिकांचे पाकिट दिल्यानंतरही छायाचित्रण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मिळणार 10 मिनिटांचा अधिक वेळ
यावर्षीपासून 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने रद्द केला आहे. यासह मंडळाने निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अधिक कालावधी देण्याचा निर्णय (HSC Exam 2023) घेतला आहे. शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे अगोदर दिल्या जात होते. यंदापासून नियमात बदल करून ही सुविधा रद्द करण्यात आली. निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा कालावधी विद्यार्थ्यांना वाढवून देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहण्यास 10 मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे.
हे आहेत महत्त्वाचे बदल (HSC Exam 2023)
1. प्रश्नपत्रिकेचे परीक्षा कक्षात वाटप निर्धारित वेळेत म्हणजेच सकाळी 11 व दुपारी 3 वाजता
2. निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे अधिक कालावधी.
3. सकाळी 10:30 व दुपारी 2:30 नंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाही
4. परीक्षक परीक्षा कक्षात उत्तरपत्रिकेवरील सूचना वाचून दाखवणार.
5. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे वितरणाचे जीपीएस ट्रॅकिंग होणार.
6. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश नाही
7. परीक्षा केंद्रावर कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश
8. शंभर टक्के विद्यार्थ्यांची प्रवेशाच्या वेळी झडती घेणार. (HSC Exam 2023)
9. परीक्षा केंद्रांवर बैठे पथके असणार.
10. जिल्ह्यात शिक्षण विभागाची सहा, तर महसूल विभागाची 10 पथके
11. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल, ग्रामविकास विभागाची पथके
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com