करिअरनामा ऑनलाईन । संरक्षण मंत्रालयाच्या वतीने सशस्त्र दलात (Agnipath Yojana) भरतीसाठी आयोजित अग्निपथ योजनेअंतर्गत निवड झालेल्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाला पुण्यात सुरुवात झाली आहे. पुण्याच्या खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर (बीईजी) तसेच दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या भागातील काही केंद्रांमध्ये अग्निवीरांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. दक्षिण मुख्यालयाने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे.
जोश आणि उत्साहाने भरलेल्या या अग्निवीरांना बीईजीच्या प्रमुखांनी राष्ट्रसेवेचा प्रवास सुरू करताना प्रामाणिकपणा आणि सन्मानाने देशसेवेची जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कराच्या पुणे भरती केंद्राद्वारे आठ भरती मेळाव्यांचे आयोजन करण्यात (Agnipath Yojana) आले होते. यामध्ये एक मेळावा हा महिला उमेदवारांसाठी होता. पुण्यासह नाशिक आणि हैदराबाद येथील आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणाला आता सुरुवात झाली आहे. प्रशिक्षणासाठी बंगळुरू येथील सैन्य पोलिस दलात (सीएमपी) पोहोचलेल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत महिलांचाही समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाने जून 2022 मध्ये अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. या अग्निवीरांना 31 आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट 2023 मध्ये लष्करात दाखल (Agnipath Yojana) केले जाईल. प्रारंभिक नियुक्ती चार वर्षांसाठी असली तरी अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील सुमारे 25 टक्के अग्निवीरांना सशस्त्र दलाच्या नियमित केडरमध्ये दाखल केले जाईल. त्यानंतर त्यांना 15 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करावा लागेल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com