करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC NET Exam) एक महत्वाची बातमी आहे. यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर 2022 सायकलची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. आणि डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल.
आता UGCने नेट परीक्षेच्या जून 2023 च्या तारखाही जाहीर केल्या आहेत. UGCचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी ट्विट केले आहे की, यूजीसी नेट जून 2023 सायकलची परीक्षा 13 ते 22 जून दरम्यान घेतली जाईल.
UGC च्या चेअरमननी दिलेल्या (UGC NET Exam) माहितीनुसार UGC NET चे आयोजन राष्ट्रीय चाचणी एजन्सी, NTA द्वारे वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये केले जाते. उमेदवारांना सूचित केले जाते की UGC NET जून 2023, पहिली सायकल परीक्षा 13 जून ते 22 जून दरम्यान घेतली जाईल.
UGC NET डिसेंबर 2022 सत्रासाठी नोंदणी देखील सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
असा करा अभ्यास (UGC NET Exam)
1. मागील प्रश्नपत्रिका बघा
जर तुम्ही UGC NET 2021 च्या परीक्षेला बसणार असाल तर परीक्षेच्या तयारीसाठी, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे लक्षात ठेवा जेणेकरुन त्यांना कोणत्या (UGC NET Exam) विषयातून प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना येईल. तसेच कोणते प्रश्न परत परत विचारले जातात याचीही कल्पना येईल.
2. मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित करा
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही नियमित मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. मॉक टेस्टचा प्राथमिक उद्देश उमेदवारांना परीक्षेच्या पॅटर्नची कल्पना मिळावी, एवढेच (UGC NET Exam) नाही तर उमेदवारांना UGC NET मॉक टेस्ट देताना वेळ मर्यादेचे पालन करून टाइम मॅनेजमेंटचा सराव करता येईल.
3. महत्त्वाच्या विषयांची यादी तयार करा
UGC-NET परीक्षेची तयारी करताना महत्त्वाच्या विषयांची (UGC NET Exam) यादी बनवून त्या विषयांतील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे. त्यामुळे त्यांना परीक्षेची तयारी वेगाने करण्यास मदत होईल. महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास आधी केला तर परीक्षा पास करण्यात मदत होऊ शकते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com