Jobs Near Me : 10वी ते ग्रॅज्युएटना नोकरीची मोठी संधी; टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत (Jobs Near Me) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदावर नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यात मल्टिटास्किंग स्टाफसाठीही काही जागा असून, विशेष म्हणजे केवळ 10 वी पास उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात.

टाटा मेमोरियल सेंटरनं 164 विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मल्टिटास्किंग स्टाफ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, नर्स, संशोधन साहाय्यक, तांत्रिक अधिकारी यांसह इतर पदांसाठी पदभरती करणार असल्याचं जाहीर केलं आहे. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवार 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत मुलाखतीसाठी येऊ शकतात.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर

भरली जाणारी पदे –

मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 12 पदे

टेक्निकल अधिकारी – 2 पदे

टेक्निकल को-ऑर्डिनेटर (डेटा) – 1 पदे

टेक्निकल को-ऑर्डिनेटर (मेडिकल) – 1 पदे

डेटा एंट्री ऑपरेटर – 38 पदे

फिल्ड इन्व्हेस्टिगेटर – 2 पदे

रिसर्च असिस्टंट – 1 पदे

डेटा एंट्री ऑपरेटर – 1 पदे

नर्स – 24 पदे

पेशंट असिस्टंट – 38 पदे

फार्मासिस्ट – 6 पदे

मल्टिटास्किंग स्टाफ (एमटीएस) – 38 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Jobs Near Me)

  • या विविध पदांसाठी उमेदवारांची पात्रता दहावी, बारावी, बीफार्म, पदवीधारक, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, एमडीएस, आयुष, एमपीएच, एमडीएस अशी असावी लागेल.
  • प्रत्येक पदानुसार अपेक्षित पात्रता असलेले उमेदवार त्याकरता अर्ज करू शकतात.
  • टाटा मेमोरियल सेंटरच्या वेबसाईटवर उमेदवारांना (Jobs Near Me) पदभरतीबाबत अधिक माहिती मिळू शकते. यात अर्ज प्रक्रिया, पगार, वयोमर्यादा, पात्रता, अनुभव, निवड प्रक्रिया व इतर आवश्यक माहिती असेल.
  • मल्टिटास्किंग स्टाफची अनेक पदं यात भरली जाणार आहेत. त्यासाठी दहावी पास असणं गरजेचं आहे. तसंच संबंधित क्षेत्रासाठी आवश्यक अनुभवही असावा लागेल.

मुलाखतीचा कालावधी – 22 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर

मिळणारे वेतन – 12 हजार रुपये ते 60 हजार रुपये दरमहा (पदानुसार)

महत्वाच्या सूचना –

विविध पदांसाठीच्या सूचना टीएमसीच्या वेबसाईटवर पाहता येतील. त्यामध्ये प्रत्येक पदासाठी पगाराची मर्यादाही नमूद केलेली आहे. त्यासाठी https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobld=18372 या वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल.

शिक्षणाच्या अभावामुळे सरकारी नोकरीपासून वंचित (Jobs Near Me) असलेल्या अनेक उमेदवारांना आता टीएमसीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी पदाची माहिती, कागदपत्रं गोळा करून वेळेत अर्ज भरणं जरुरीचं आहे.

मुलाखतीचा पत्ता – TATA MEMORIAL HOSPITAL Dr. E Borges Road, Parel,Mumbai – 400 012 India
Phone: +91-22- 24177000, 24177300, 24161413

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – Advertise

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com