करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्रातील अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात (Career News) आपला ठसा उमटवून जागतिक स्तरावर मराठी मातीचं नाव मोठं केलंमिळवला आहे. अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाने आघाडीच्या संशोधकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या डॉ. रमेश देवकाते यांचा समावेश झाला आहे.
दरवर्षी, स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची यादी जाहीर केली जाते. विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात डॉ. रमेश देवकाते यांना यावर्षीच्या जागतिक क्रमवारीत स्थान मिळाले आहे. डॉ. देवकाते हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विषयाचे सहाय्यक प्राध्यापक आहेत.
डॉ. रमेश देवकाते यांच्याविषयी….
डॉ. रमेश देवकाते यांनी पदार्थ विज्ञानात PHD मिळवली आहे. विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांना संशोधनातील 15 वर्षांचा अनुभव आहे. तसेच त्यांनी सौर ऊर्जा, सुपरकॅपॅसिटर, बॅटरी, व वॉटर स्प्लिटींग इत्यादी बाबींवर संशोधन केले आहे.
अशी तयार होते संशोधकांची यादी – (Career News)
स्टॅनफर्ड विद्यापीठातील अभ्यासकांकडून जगभरातील संशोधकांच्या संशोधन कार्याचा सांख्यिकीय अभ्यास केला जातो. त्यात कोम्पॉसिट इंडिकेटर काढला जातो आणि मग यानंतर त्यावरुन ही यादी तयार केली जाते.
दरम्यान, डॉ. देवकाते यांनी आजवर जे संशोधन केले, त्या (Career News) भरीव कामगिरीमुळे त्यांची 2019 मध्ये भारत सरकारच्या भास्करा अँडन्हान्स्ड सोलर एनर्जी (BASE) फेलोशीप प्रोग्रॅममध्ये निवड झाली होती. या फेलोशीप प्रोग्रॅममध्ये देशभरातून फक्त सहा जणांची निवड झाली होती. त्यात त्यांचा समावेश होता.
मिळाला 43 लाखांचा निधी –
या फेलोशीपच्या माध्यमातून त्यांनी मिसूरी युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी (रोला, अमेरिका) येथे पोस्ट डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांना भारत सरकार व विद्यापीठ स्तरावर संशोधन प्रकल्पांसाठी 43 लाखांचा निधी मिळाला आहे. यावर्षी सायन्स अँड इंजिनीरिंग रिसर्च इंजिनीरिंग बोर्ड (SERB) यांच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या टीचर्स असोसिएटशिप फॉर रिसर्च एक्सलन्स (TARE) या फेलोशीपसाठीही त्यांची (Career News) निवड झाली आहे. या माध्यमातून ते बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स बंगलोर या ठिकाणी बॅटरी साठी लागणाऱ्या पदार्थावर ते तीन वर्षे संशोधन करणार आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com