Zomato Job Cuts : ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ झोमॅटोचा दणका; 4 टक्के कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। ट्विटर, अमेझॉन पाठोपाठ आता भारतीय फूड (Zomato Job Cuts) डिलिव्हरी अॅप झोमॅटोने कर्मचारी कपात सुरु केली आहे. कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत झोमॅटोचे नाव सामील झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झोमॅटोने या आठवड्यापासूनच कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, कॅटलॉग आणि मार्केटींग यासारख्या क्षेत्रांमध्ये कमीतकमी 100 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर याआधीच परिणाम झाल्याचे  म्हटले जाते. Supply Chain मधील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला नाही. झोमॅटो आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी किमान 4 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे.

झोमॅटोचे सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्मचारी कपातीची बातमी समोर आली आहे. झोमॅटोने हे कठोर पाऊल उचलल्यास ते कर्मचार्‍यांना काढून टाकणाऱ्या (Zomato Job Cuts) दिग्गज कंपन्यांच्या यादीत सामील होतील. ही कपात नियमित कामगिरीवर आधारित असेल. ऑनलाइन ऑर्डरचे प्रमाण आणि मूल्य वाढल्यामुळे कंपनीने गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीत माफक तोटा नोंदवला आहे.

झोमॅटोमध्ये सध्या साधारण 3,800 कर्मचारी काम करत आहेत. मे 2020 मध्ये, फूड डिलिव्हरी अॅपने कोरोनामधील व्यवसायातील मंदीमुळे 13 टक्के कर्मचारी काढून टाकले. यासोबतच (Zomato Job Cuts) वरिष्ठ अधिकारीही झोमॅटोची नोकरी सोडत आहेत. राहुल गंजू देखील कंपनी सोडत आहे. यासोबतच कंपनीचे उपमुख्य वित्तीय अधिकारी नितीन सावरा आणि ग्लोबल ग्रोथचे उपाध्यक्ष सिद्धार्थ झंवर यांनीही अलीकडेच कंपनीशी संबंध तोडले असल्याचे समोर आले आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com