करिअरनामा ऑनलाईन। भारतीय हवाई दलात भरती होऊन (Agniveer Air Force Recruitment) देशसेवा करण्याचे आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत 12वी पाससाठी अग्निवीर वायु भरती 2023 साठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अग्निवीर वायु भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 23 नोव्हेंबरपर्यंत हवाई दलाच्या वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर भेट देऊन करता येतील. भारतीय हवाई दलात अग्निवीर वायूची भरती चार वर्षांसाठी असेल. चार वर्षांनी सेवानिवृत्ती देऊन काहींना दिलासा मिळणार आहे.
अग्निवीर वायु यांना पदमुक्त झाल्यानंतर केंद्रीय सशस्त्र दल, राज्य पोलिसांसह इतर नोकऱ्यांमध्ये सूट मिळेल. आज आम्ही तुम्हाला अग्निवीर वायुचा पगार, सुट्या यासह सर्व सुविधांबद्दल सांगणार आहोत.
अग्निवीर वायुची नोकरी किती वर्षांची? (Agniveer Air Force Recruitment)
वायुसेना कायदा 1950 अंतर्गत, भारतीय हवाई दलात अग्निवीर वायुची भरती 4 वर्षांसाठी असेल.
4 वर्षानंतर 25 टक्के अग्निवीरांची हवाई दलाच्या नियमित केडरमध्ये भरती केली जाईल.
अग्निवीर वायुला किती सुट्या मिळणार?
- वार्षिक रजा – अग्निवीर वायुला दरवर्षी 30 सुट्या मिळतील.
- वैद्यकीय रजा- वैद्यकीय सल्ल्यानुसार मिळतील. (Agniveer Air Force Recruitment)
वैद्यकीय आणि CSD सुविधा मिळतील का?
अग्निवीरवायूच्या सेवेदरम्यान, हवाई दल सेवा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा आणि CSD सुविधा प्रदान करेल.
किती मिळणार पगार?
अग्निवीरवायूला पहिल्या वर्षी 30 हजार पगार मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी 33000 रुपये, तिसऱ्या वर्षी 36500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मिळतील.
अशी मिळणार विमा सुविधा?
अग्निवीर वायुचा 48 लाखांचा जीवन विमा असेल. (Agniveer Air Force Recruitment)
4 वर्षांनंतर अग्निवीर वायुला कोणते प्रमाणपत्र मिळणार?
अग्निवीर वायुला 4 वर्षांनंतर कौशल्य प्रमाणपत्र मिळणार आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com