करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Education) सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनांपैकी राज्य सरकार समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी हिताच्या योजना राबवल्या जातात. या समाजकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय वसतीगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
या विद्यार्थ्यांना गणवेश, रेनकोट, बूट अशा शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर 2,642 रुपयांचे अनुदान वितरित केलं जाणार आहे. यांसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
शासकीय वसतीगृह निवासी शाळातील विद्यार्थ्यांना (Education) गणवेश, बुटाचे वाटप केलं जातं मात्र या वाटप प्रक्रियेत होणारे अपहार विद्यार्थ्यांना न मिळणाऱ्या वस्तू या सर्वांच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. याचबरोबर शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अनुदान आता डीव्हीडीच्या स्वरूपात देण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे, त्या पद्धतीने आता अंमलबजावणी देखील केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर 2016 मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार, आता या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावरती गणवेश, बूट,आणि रेनकोट साठी दिली जाणारी रक्कम (Education) वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना आता बूट, शालेय गणवेश, पीटी गणवेश आणि रेनकोट अश्या चार वस्तू खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. याच्यामध्ये बूट खरेदी करण्यासाठी (Education) शासन प्राप्त किंमत 285 रुपये असेल, याप्रमाणे शाळेचे युनिफॉर्मसाठी 926 रुपये, पीटी गणवेशसाठी 945 रुपये तर रेनकोट खरेदी साठी 491 रुपये अशा प्रकारे एका विद्यार्थ्याला 2642 रुपये एवढी रक्कम प्रतिवर्षी एका विद्यार्थ्याला प्राप्त होणार आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये 60% रक्कम जमा केली जाणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या माध्यमातून गणवेश, बूट, रेनकोट इत्यादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्या पावत्या शाळेमध्ये जमा केल्यानंतरच उर्वरित 40% रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.
आधार संलग्न बॅंक खात्यावरती लाभ देण्याची कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने केली जाणार आहे. याच्या लाभार्थी याद्या किंवा याच्याबद्दलची कुठलीही माहिती सामाजिकरीत्या (Education) प्रकाशित केली जाणार नाही. आणि अशाप्रकारे गोपनीय माहितीसह या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रतिवर्षी युनिफॉर्म, बूट आणि रेनकोट खरेदी साठी 2642 रुपये एवढी रक्कम या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. .
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com