Education Loan : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!! तारण न देता 10 लाखापर्यंत मिळणार शैक्षणिक कर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर विद्यार्थी शिक्षणासाठी कर्ज (Education Loan) काढतात. आता या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार शैक्षणिक कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे; या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. सरकार या कर्जाची हमी मर्यादा 7,50,000 रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकते. याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि कोणत्याही हमी शिवाय त्वरित कर्ज मिळेल. कर्ज मिळण्यात विद्यार्थ्यांचा वेळ जात असल्याच्या तक्रारी आहेत. मंजूर नसलेल्या कर्जामुळे किंवा विनाकारण वेळ घेतल्याने आपल्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रारही विद्यार्थ्यांनी केली आहे.

अशी असेल हमी मर्यादा (Education Loan)

सध्याच्या परिस्थितीत 7,50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारची क्रेडिट गॅरंटी फंड सुविधा उपलब्ध आहे. 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, बँकेला विद्यार्थ्याकडून कोणत्याही प्रकारची हमी किंवा तारण आवश्यक नाही. त्यामुळे कर्जाचा वापर लवकर करता येतो. सरकार कर्ज हमी निधीची मर्यादा 7,50,000 रुपयांवरून 10 लाख रुपये करणार आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही महागाई वाढली आहे, त्यामुळे केंद्र सरकार कर्जाची रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाच्या संबंधित विभागांनी शिक्षण मंत्रालयाशी सल्लामसलत सुरू केली आहे. या संदर्भात शैक्षणिक कर्जाची हमी मर्यादा 33% पर्यंत (Education Loan) वाढविण्याचा विचार सुरू आहे. या निर्णयामुळे देशातील अनेक भागांमध्ये कर्जाची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. हा नियम पूर्णपणे सरकारी योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाशी संबंधित आहे, ज्यामध्ये सरकार विद्यार्थ्यांना कर्ज देते.

सरकारची भूमिका

आर्थिक सेवा विभाग असुरक्षित शैक्षणिक कर्ज मर्यादा वाढविण्याच्या विचारात आहे आणि शिक्षण विभागाशी चर्चा करत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे तारण न देता 10 लाख किंवा त्याहून अधिक कर्ज घेऊ शकतात.

सरकारी बँका आपला वेळ वाया घालवत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. त्यानंतर सरकारने बँकांना शक्य तितक्या लवकर विद्यार्थ्यांना कर्ज देण्याचे आदेश दिले; परंतु आता (Education Loan) कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बँकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील थकबाकीची चिंता करण्याची गरज नाही कारण सरकार हमी देण्याच्या भूमिकेत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com