करिअरनामा ऑनलाईन। नोकरी मिळवण्यासाठी लोक धडपडतात. वाट्टेल ते प्रयोग करून होणाऱ्या बॉसला (Viral Things) खुश करण्याचा प्रयत्न करतात. याच धर्तीवर आजवर कधीही न पाहिलेले एक जॉब अप्लिकेशन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॉब मिळावा म्हणून अमेरीकेतील एका तरुणीने जॉब अप्लिकेशन चक्क केकवर लिहून पाठवले आहे. या तरुणीने स्वतःच तीचा रिज्युम लिंक्डइनवर शेअर केला आहे.
आगळी वेगळी आयडिया
अनेकांना वाटत असते की आपला रिज्युम बघूनच बॉस आपल्यावर खुश व्हावा. आणि त्याने आपल्याला हवी त्या पॅकेजची नोकरी ऑफर करावी. त्यासाठी रिज्युम स्ट्रॉंग करण्यावर भर दिला जातो. पण या तरुणीने हे सगळे नियम मोडीत (Viral Things) काढत ‘नायकी’ या स्पोर्ट्स साहित्य बनवणाऱ्या कंपनीला केकवर प्रिंट करून रिज्युम पाठवला आहे. ही तरुणी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहत असून तिचे नाव कार्ली पावलिनॅक ब्लॅकबर्न असे आहे.
कार्लीने तिच्या पोस्टमध्ये लिहीले होते की, काही वेळाआधी माझा बायोडाटा नायकी या कंपनीला पाठवला आहे. हा बायोडेटा मी एका केकवर प्रींट केला होता. जो पूर्णपणे खाण्यायोग्य होता. नायकीने ‘जस्ट डू इट डे’ साठी एक सेलिब्रेशन ठेवले होते. ज्यामध्ये अनेक मेगास्टार्स हजर होते.
केकवरच्या Resume ने वेधले कंपनीचे लक्ष्य
कार्ली पुढे म्हणते की, त्या कंपनीत कोणतीही पोस्ट निघाली नव्हती. केवळ कंपनीचे आपल्याकडे लक्ष जावे आणि त्यांनी आपल्याला कामाची संधी द्यावी, यासाठी मी त्यांना केक पाठवला. ही (Viral Things) आयडीया मला माझ्या एका मित्राने दिली होती. त्यामुळे ‘जेडी डे’ सेलिब्रेशनची माहिती मिळताच मी त्यांना केक पाठवला.
नेटकऱ्यांनीही तो शेअर करत तुझी नोकरी तर फिक्सच आहे, असा रिप्लाय तिला दिला आहे. आता या मुलीचे ऐकून भारतातील बेरोजगार तरूणांनी कंपन्यांना चपाती, भाकरीवर रिज्यूम लिहून पाठवला तर नवल वाटायला नको.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com