करिअरनामा ऑनलाईन | माजी राष्ट्रपती राधाकृष्णन हे स्वतः शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षक असल्याने त्यांचा सन्मान (Education) करण्यासाठी 5 सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो.शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील 14,500 शाळांना HighTech करण्याची योजना त्यांनी जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
मोदींचं निवेदन – (Education)
“आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर मला एक नवीन उपक्रम जाहीर करताना आनंद होत आहे – प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) या योजनेअंतर्गत देशभरातील 14,500 शाळांचा विकास आणि अपग्रेडेशन करण्यात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पूर्ण ऊर्जेने अंतर्भूत या मॉडेल स्कूल बनतील.”, असे ट्विट मोदींनी केले आहे.
Today, on #TeachersDay I am glad to announce a new initiative – the development and upgradation of 14,500 schools across India under the Pradhan Mantri Schools For Rising India (PM-SHRI) Yojana. These will become model schools which will encapsulate the full spirit of NEP.
— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2022
PM-SHRI या योजना अतंर्गत असलेल्या शाळांमध्ये शिक्षण देण्याची आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण पद्धत असेल. तसेच अध्यापनाच्या शोधकेंद्रित शिक्षण पद्धतीवर भर दिला जाईल. इतकेच नव्हे तर (Education) याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि यासह बऱ्याच काही आधुनिक पायाभूत सुविधांवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने अलिकडच्या वर्षांत शिक्षण क्षेत्राचा कायापालट केला आहे. मला खात्री आहे की PM-SHRI शाळांचा NEP च्या भावनेने भारतातील लाखो विद्यार्थ्यांना आणखी फायदा होईल, असेही मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com