Job Alert : तुमचा Resume ठेवा रेडी! देशातील ‘या’ ट्रेंडिंग क्षेत्रात मिळणार नोकऱ्याच नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। भारतात कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत कित्येक तरुणांना नोकरीपासून (Job Alert) हात धुवावा लागला आहे. मात्र आता अर्थचक्र रुळावर येत असून कंपन्यांकडून नोकरभरती वाढू लागल्याचं चित्र आहे. त्यातच आता नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात देशातल्या ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी कामगारांची भरती करण्याच्या तयारीत आहेत.

ई-कॉमर्स कंपन्या नोकरभरती करण्याच्या तयारीत

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या वर्षी बंपर नोकरभरती सुरू होण्याची शक्यता आहे. टाटा, बिगबास्केट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या नोकरभरती करण्याच्या तयारीत आहेत. नोकरभरतीची या कंपन्या एवढी घाई का करत आहेत, असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. त्याची प्रमुख दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे सणासुदीचा हंगाम आणि दुसरे कारण म्हणजे बेरोजगारीचा कमी झालेला दर.

सणासुदीच्या काळात मिळणार नोकरी

भारतात बेरोजगारीचा दर जानेवारीनंतर प्रथमच जुलैमध्ये 7 टक्क्यांच्या खाली आला. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रासमोरची आव्हानं वाढली आहेत. हे क्षेत्र आधीच कर्मचारी मिळत नसल्यामुळे अडचणीत आहे. त्यातच आता गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असा सणासुदीचा हंगाम जवळ आलाय. सणासुदीच्या काळात इतर दिवसांच्या तुलनेत विक्री अनेक पटींनी वाढते. या काळात कपडे, शूज, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, किराणा सामान आदी वस्तू सर्वाधिक ऑर्डर केल्या जातात. ऑर्डर्सची संख्या वाढल्याने व त्या डिलिव्हरी करण्यास पुरेसं मनुष्यबळ नसेल, तर अनेकदा मालाची डिलिव्हरी होण्यास उशीर होतो. अशा वेळी गैरसोयीमुळे ग्राहक ऑर्डर रद्दही करतात. यामुळे कंपन्यांचे मोठं नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठीच सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्या नोकरभरती वाढवतात.

त्याच अनुषंगाने ई-कॉमर्स कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची भरती करत आहेत. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या सर्वांत मोठ्या खरेदीच्या हंगामात कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते, अशी भीती कंपन्यांना वाटत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतलाय. ऑनलाइन किराणा विक्रेती कंपनी असलेल्या बिगबास्केटचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीके बालकुमार (Job Alert) यांच्या म्हणण्यानुसार, गिग वर्क फोर्सच्या मागणीत मोठी वाढ झालीय. टाटा समूहाने त्यांच्या BB Now या झटपट डिलिव्हरी सेगमेंटमध्ये डिलिव्हरी भागीदारांची संख्या मार्च तिमाहीतल्या 500 वरून जून तिमाहीत 2200 पर्यंत वाढवली आहे. हे लक्ष्य मार्च 2023 पर्यंत सुमारे 6000 पर्यंत नेण्याचं आहे.

दरम्यान, बिगबास्केट आणि ई-कॉमर्स फर्म डंझो यांच्याकडे ऑर्डर्सची डिलिव्हरी करण्यासाठी स्वतःचे कर्मचारी आहेत. कॉस्मेटिक्स-टू-फॅशन रिटेलर नायका यांसारख्या कंपन्या डिलिव्हरी सेवा देण्यासाठी थर्ड पार्टीवर अवलंबून असतात. थिंक टँक निती आयोगाने जूनमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गिग वर्क एम्प्लॉयमेंटमध्ये (Job Alert) डिलिव्हरी कामगार आणि सेल्समन यांचा मोठा वाटा आहे. हा आकडा 2022-23मध्ये भारतात 90 लाखांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. तो 2019-20 च्या तुलनेत सुमारे 45 टक्के अधिक आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com