करिअरनामा ऑनलाईन | विद्यापीठ अनुदान आयोगाकडून चार शिष्यवृत्ती योजनांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली (UGC Scholarship 2022) आहे. पात्र उमेदवार UGC शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Scholarships.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. ईशान्य क्षेत्रासाठी यूजीसी इशान उदय शिष्यवृत्ती, यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी), विद्यापीठ रँक धारकांसाठी पीजी शिष्यवृत्ती, एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती अशा स्कॉलरशिप्स जाहीर करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया या स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा करायचा आणि यासाठी आवश्यक पात्रतेविषयी…
जाहीर झालेल्या 4 स्कॉलरशीप –
- यूजीसी इशान उदय शिष्यवृत्ती
- यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी)
- युनिव्हर्सिटी रँक धारकांसाठी पीजी शिष्यवृत्ती
- एससी (SC), एसटी (ST) विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती
जाणून घ्या स्कॉलरशिपविषयी – (UGC Scholarship 2022)
1. UGC PG इंदिरा गांधी शिष्यवृत्ती (अविवाहित मुलीसाठी) (UGC PG Indira Gandhi Scholarship)
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022
आवश्यक पात्रता –
ज्या मुलींनी यूजीसी मान्यताप्राप्त महाविद्यालये/विद्यापीठांमध्ये पीजी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम – ₹36,200 प्रतिवर्ष
2. युनिव्हर्सिटी रँक धारकांसाठी यूजीसी पीजी शिष्यवृत्ती (UGC PG Scholarship for University Rank Holders)
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022
पात्रता – विद्यापीठाच्या पदवी स्तरावर प्रथम आणि द्वितीय क्रमांक धारक आणि कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश.
शिष्यवृत्तीची रक्कम – ₹3,100 प्रति महिना
3. एससी, एसटी विद्यार्थ्यांसाठी पीजी शिष्यवृत्ती
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022
आवश्यक पात्रता – SC, ST विद्यार्थी UGC मान्यताप्राप्त संस्थांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम घेत आहेत.
शिष्यवृत्तीची रक्कम – ME/MTech साठी दरमहा ₹7,800 आणि इतरांसाठी ₹4,500.
4. UGC इशान उदय शिष्यवृत्ती (UGC Ishan Uday Scholarship)
अर्ज करण्याची अंतिम मुदत – 31 ऑक्टोबर 2022
आवश्यक पात्रता – ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे सर्व स्रोतांमधून वार्षिक उत्पन्न 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही.
शिष्यवृत्तीची रक्कम – सामान्य पदवी अभ्यासक्रमांसाठी दरमहा ₹5,400 आणि तांत्रिक/वैद्यकीय/व्यावसायिक/पॅरामेडिकल अभ्यासक्रमांसाठी ₹7,800 दरमहा
- अर्ज करण्यासाठी लिंक –
UGC शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) Scholarships.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com