MSC Bank Recruitment : रिटायर्ड अधिकाऱ्यांसाठी मोठी संधी! राज्यातील ‘या’ बँकेत मिळेल 85,000 रुपये पगाराची नोकरी

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे लवकरच काही जागांसाठी (MSC Bank Recruitment) भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष कर्तव्य अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

भरले जाणारे पद – 

विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty)

पद संख्या – 01 पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) –
  1. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. तसंच अतिरिक्त पात्रता जसे की JAIIB/ CAIIB यांना प्राधान्य दिले जाईल.
  3. चार्टर्ड अकाउंटंट (CA) पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. (MSC Bank Recruitment)
  4. उमेदवार हे बँकेतून सिनिअर लेव्हलवरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.
  5. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  6. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

विशेष कर्तव्य अधिकारी (Officer on Special Duty) – 85,000/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठी पत्ता – (MSC Bank Recruitment)

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001.

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com