करिअरनामा ऑनलाईन। अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असलेल्या ‘JEE Main’ मध्ये यावर्षी पैकीच्यापैकी (JEE Success Story) मार्क मिळवलेला विद्यार्थी पुन्हा एकदा ती परीक्षा देणार आहे. राजस्थानच्या हनुमानगढमधील नव्य हिसारिया याला जेईई मेन 2022 च्या पहिल्या राऊंडमध्ये फक्त 100 पर्सेंटाईलच नव्हे, तर 300 पैकी 300 मार्कही मिळाले होते. आता या वर्षी होणाऱ्या दुसऱ्या सेशनमध्ये तो पुन्हा परीक्षेला बसणार आहे. यामुळे आपला आणखी सराव होईल, तसंच टाईम-मॅनेजमेंट स्किल वाढवण्यासाठी याचा फायदा होईल, असं नव्यचं म्हणणं आहे.
‘हे’ आहे कारण –
JEE परीक्षांच्या नियमांनुसार, दोन्ही सेशनला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे ज्या सेशनला जास्त गुण आहेत तेच गृहित धरले जातात. त्यामुळे दुसऱ्या वेळी या परीक्षेत नव्यला कमी मार्क मिळाले, तरी पहिल्या वेळेचे जास्त (JEE Success Story) मार्क अंतिम असतील. त्यामुळे नव्य निश्चिंतपणे दुसऱ्या सेशनमध्ये परीक्षा देऊ शकतो. ‘जेईई मेन परीक्षेमध्ये दिलेल्या वेळात पेपर पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन करणं शिकायला मिळतं. परीक्षा दिल्यामुळे आपली किती तयारी झाली आहे, हे लक्षात येतं. तसंच, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी हा चांगला सरावदेखील आहे.’ असं नव्यचं म्हणणं आहे.
अशी केली तयारी (JEE Success Story)
नव्यचे वडील व्यावसायिक असून, आई सामाजिक कार्यकर्त्या आहेत. 17 वर्षांचा नव्य सध्या आयआयटी प्रवेश परीक्षा असलेल्या जेईई अडव्हान्स्डची तयारी करत आहे. त्याला आयआयटी बॉम्बेमधून कम्प्युटर सायन्स शिकायचं आहे. नव्यने दहावीनंतरच जेईईची तयारी सुरू केली होती. कोटामध्ये असलेल्या अलन करिअर इन्स्टिट्यूटचा तो विद्यार्थी आहे. नव्य सांगतो, ” मी कोचिंग क्लासेस व्यतिरिक्त अन्य कोणतेही वेगळे पुस्तक रेफर केले नाही. फक्त क्लास नोट्स आणि दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण केला. दररोजचा अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करत गेल्यामुळे मला अभ्यासाचा एकदम ताण जाणवला नाही.” या टिप्स तमाम विद्यार्थी वर्गासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.
JEE ची तयारी करत असताना १२ वी बोर्डाची तयारी झाली
१२ वी बोर्डाच्या परीक्षेविषयी सांगताना नव्य म्हणाला; “जेईईचा अभ्यास करत असतानाच मी बारावीकडेही दुर्लक्ष केले नाही. ‘फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचा अभ्यासक्रम जेईई (JEE Success Story) आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन्हीमध्ये सारखाच आहे. त्यामुळे जेईईच्या तयारीवेळीच माझी बारावी बोर्डाची तयारीही झाली. इंग्लिश विषयासाठी शाळेने ऑनलाईन घेतलेले क्लास आणि नोट्स पुरेशा होत्या.” असं नव्यने सांगितलं.
‘दहावीतच ठरवलं इंजिनियर व्हायचं’
नव्यने दहावीच्या परीक्षेच्या दोन-तीन महिने आधीच इंजिनअर होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दहावी झाल्यानंतर लगेच त्याने त्यादृष्टीने तयारी सुरू केली. दहावीला त्याला 97.40 टक्के गुण मिळाले होते. तर, बारावीचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. त्याने सीबीएसईच्या अपाला स्कूल ऑफ एज्युकेशन या शाळेतून दहावी आणि बारावी पूर्ण केली.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com