करिअरनामा ऑनलाईन । देशातील दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या (Tata Motors Recruitment) टाटा कंपनीनं सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेनं अधिक कल असलेल्या टाटा कंपनीनं आता एक उल्लेखनीय पाऊल उचललं आहे.
देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक चारचाकी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने ईव्ही तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ (Skilled manpower) निर्माण करण्यासाठी भारतातील प्रमुख संस्था एमिटी विद्यापीठाशी हातमिळवणी केली आहे.
असा आहे करार आणि त्याचे फायदे – (Tata Motors Recruitment)
- एमिटी विद्यापीठ आणि टाटा मोटर्स या दोन्ही कंपन्यांनी एक भागीदारी करार केला आहे.
- यामध्यमातून इलेक्ट्रिक वाहन उद्योगात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना एम-टेक पदवी प्रदान केली जाणार आहे.
- एमिटी युनिव्हर्सिटीच्या लखनऊ कॅम्पसमधून हा कोर्स करता येतो.
- यामध्ये टाटा मोटर्स पदवीसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लखनऊ येथील प्लांटमध्ये काम करण्याची संधी देणार आहे.
कोर्समध्ये मिळणार Practical Knowledge –
- इलेकट्रीक व्हेईकल तंत्रज्ञानातील एम-टेक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्ये शिकवली जातील.
- यामुळे केवळ इलेकट्रीक व्हेईकल क्षेत्रात (Tata Motors Recruitment) रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार नाही, तर देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कुशल मनुष्यबळही वाढेल.
- दोन वर्षे आणि चार सेमिस्टरचा हा अभ्यासक्रम दोन भागात शिकविला जाणार आहे. पहिला भाग तांत्रिक अभिमुखता (Technical Orientation) असेल, ज्यामध्ये या तंत्रज्ञानाशी संबंधित सिद्धांत शिकवला जाईल.
- दुसऱ्या भागात प्रात्यक्षिक (practical) सत्रे असतील.
काय आहे तज्ञांचे मत –
“टाटा मोटर्स कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे जे आमच्या शेअर्स धारकांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यास सक्षम असेल.एमिटी युनिव्हर्सिटीसोबतची ही भागीदारी (Tata Motors Recruitment) केवळ करिअरच्या विकासासाठीच नव्हे तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उघडेल. यामुळे भविष्यासाठी मनुष्यबळ तयार होण्यासही मदत होईल.”, असं टाटा मोटर्सचे अध्यक्ष आणि सीएचआरओ रवींद्र कुमार जीपी म्हणाले.
“या सहयोगी कार्यक्रमावर टाटा मोटर्ससोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. हा परस्पर फायदेशीर उपक्रम ज्ञानाच्या समृद्ध देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल (Tata Motors Recruitment) आणि विद्यार्थ्यांना नवीन उद्योग कौशल्ये शिकण्याची संधी देईल”, असं एमिटी युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्रोफेसर सुनील धनेश्वर म्हणाले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com