करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्याने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर (Agnipath Yojana) भर्ती रॅली 2022 ची अधिसूचना जारी केली आहे. अग्निवीर भरती रॅलीसाठी ऑनलाइन नोंदणी जुलैमध्ये सुरू होणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सैन्यात अग्निवीर होण्यासाठी उमेदवारांना पूर्वीप्रमाणेच शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अग्निवीर म्हणून भरती व्हायचं असेल तर कोणत्या प्रकारची आणि कशी Physical Test द्यावी लागेल याबद्दलची माहिती देणार आहोत. जाणून घेऊया सविस्तर…
धावणे – (Agnipath Yojana)
- 1.6 किलोमीटर धावणं आवश्यक असेल.
- गट I – 5 मिनिटे 30 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 60 गुण मिळणार
- गट II – 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 45 सेकंदमध्ये पूर्ण केल्यास – 48 गुण मिळणार
बीम (पुल अप) –
- 10 बीम पुल अप केल्यास – 40 गुण मिळणार
- 9 बीम पुल अप केल्यास – 33 गुण मिळणार
- 8 बीम पुल अप केल्यास – 27 गुण मिळणार
- 7 बीम पुल अप केल्यास – 21 गुण मिळणार
- 6 बीम पुल अप केल्यास – 16 गुण मिळणार
लांब उडी –
उमेदवारांना 9 फूट लांब उडी आणि झिगझॅग बॅलन्सिंगसह धावणे आवश्यक आहे. तसंच इतरही काही टेस्ट घेण्यात येणार आहेत.
वैद्यकीय चाचणी –
रॅलीच्या ठिकाणी विहित वैद्यकीय मानकांनुसार (Agnipath Yojana) वैद्यकीय चाचणी होईल. अपात्र आढळलेल्या उमेदवारांना तज्ज्ञांच्या पडताळणीसाठी लष्करी रुग्णालयात पाठवले जाईल. उमेदवारांना रेफरलच्या पाच दिवसांच्या आत संबंधित लष्करी रुग्णालयात अहवाल द्यावा लागेल आणि 14 दिवसांच्या आत रुग्णालयाद्वारे पुनरावलोकन वैद्यकीय चाचणी केली जाईल.
पद आणि वय मर्यादा –
- Agniveer (General Duty) (All Arms) – 17 ½ – 23 वर्षे
- Agniveer (Tech) – 17 ½ – 23 वर्षे
- Agniveer Tech (Aviation & Ammunition Examiner) – 17 ½ – 23 वर्षे
- Agniveer Clerk / Store Keeper Technical (All Arms) – 17 ½ – 23 वर्षे
- Agniveer Tradesmen (All Arms) (10th pass) – 17 ½ – 23 वर्षे
- Agniveer Tradesmen (All Arms) (8th pass) – 17 ½ – 23 वर्षे
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com