SSC Result 2022 : अखेर ठरलं!! दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार; असा चेक करा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र (SSC Result 2022) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागलेले होते. आता प्रतिक्षा संपली असून निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच 17 जून रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. 17 जून, 2022 रोजी दु. 1 वा.ऑनलाईन जाहीर होईल असं ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. (SSC Result 2022)

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 1:०० नंतर पाहता येतील.

येथे पहा निकाल – (SSC Result 2022)

http://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in

असा चेक करा निकाल –

  1. इयत्ता 10वीचा महाराष्ट्र SSC निकाल तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला www.mahresult.nic.in या महाराष्ट्र बोर्डाच्या निकाल पोर्टलच्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
  2. SSC परीक्षेसाठी MSBSHSE निकालासाठी अधिकृत वेबसाइट उघडल्यानंतर SSC परीक्षेचा निकाल हा पर्याय येईल ज्यावर विद्यार्थ्यांना पुढील वेब पेजवर भेट देण्यासाठी क्लिक करा. (SSC Result 2022)
  3. यानंतर परीक्षार्थीच्या आईचे नाव आणि विद्यार्थ्याचा रोल नंबर ही महत्त्वाची माहिती टाकण्यास विसरू नका.
  4. विद्यार्थ्यांना दोन्ही आवश्यक क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.
  5. नंतर View Result पर्यायावर क्लिक करा.
  6. तुमचा निकाल तुमच्या समोर असेल.
  7. पुढील रेफरन्ससाठी निकाल डाउनलोड किंवा सेव्ह करून ठेवा.
  8. पुढील उपयोगासाठी निकालाची प्रिंट काढून ठेवा.

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com