Agneepath Yojana : सज्ज व्हा!!! लष्करात होणार ‘अग्निविरांची’ परेड; केंद्राकडून ‘अग्निपथ’ योजना लाँच; महिलांचाही होणार समावेश; पहा काय आहेत वैशिष्ट्ये…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून भरती प्रक्रियेमध्ये (Agneepath Yojana) आज मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. लष्कर भरतीसाठी आता केंद्र सरकारने ‘अग्निपथ योजना’ जाहीर केलेली आहे. दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज याविषयी माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत लष्करात भरती होणार्‍या युवकांना ‘अग्नीवीर’ म्हटलं जाणार आहे. हे अग्नीवीर आयटीआय आणि अन्य टेक्निकल इन्स्टिट्युशन द्वारा देखील भरती केले जाऊ शकतात. लष्करभरतीसाठी उमेदवारांचे किमान वय कमी करण्याचा देखील विचार प्रस्तावाधीन असल्याची माहिती मिळाली आहे.

अशी आहेत अग्निपथ योजनेची वैशिष्ट्ये –

  • अग्निपथ योजनेद्वारा युवक/ युवती 4 वर्षांसाठी सेनेत सहभागी होऊ शकतो.
  • चार वर्षांच्या शेवटी जवळजवळ 80% सैनिकांना ड्यूटीतून मुक्त केले जाईल.
  • पुढील रोजगाराच्या संधींसाठी सशस्त्र दलाकडून मदत मिळेल. (Agneepath Yojana)
  • चार वर्षांनंतरही केवळ 20 टक्के जवानांना संधी मिळणार आहे. मात्र, त्यावेळी देखील सैन्यभरती असल्यास हे शक्य होईल.
  • योजनेंतर्गत सशस्त्र दलांचे युवा प्रोफाइल तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
  • तरुणांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • चार वर्षांची नोकरी सोडल्यानंतर तरुणांना सेवा निधी पॅकेज देण्यात येणार आहे.
  • दरम्यान यामध्ये 17.5 ते 21 वर्षे वयोगटातील तरुणांना संधी दिली जाणार आहे.
  • त्यासाठी प्रशिक्षण कालावधी 10 आठवडे ते 6 महिन्यांचा असेल.
  • 10/12 वी चे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. (Agneepath Yojana)
  • अग्निवीरांची पहिली भरती 90 दिवसांची असेल.
  • देशसेवेदरम्यान कोणत्याही अग्निवीराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना व्याजासह सेवा निधीसह 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा केली जाणार आहे.
  • अग्नीपथ द्वारा महिलांचा देखील लष्करात समावेश करून घेतला जाणार आहे.

जनरल बिपीन रावत यांची कल्पना (Agneepath Yojana)

तत्कालीन CDS जनरल बिपिन रावत हे भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांसाठी ‘टूर ऑफ ड्यूटी’ योजनेवर काम करत होते, ज्या अंतर्गत सैन्यातील अधिकाऱ्यांना फक्त तीन वर्षांसाठी सेवा द्यावी लागली होती. मात्र जनरल बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर ही योजना रखडली. त्याच धर्तीवर आता शिपाई तसेच अधिकाऱ्यांच्या पदांसाठी ‘अग्निवीर’ योजना आणण्याची योजना सरकार तयार करत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती होती बंद

गेल्या दोन वर्षांपासून सैन्य भरती बंद आहे. या वर्षाच्या सुरुवातीला संरक्षण राज्यमंत्री (Agneepath Yojana) अजय भट्ट यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना लेखी उत्तर दिले होते; की कोरोना महामारीमुळे लष्कराच्या भरती मेळाव्याला स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय हवाई दल आणि नौदलातील भरतीवर बंदी आहे. मात्र, अधिकारी दर्जाच्या परीक्षा आणि कमिशनिंगवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र सैनिक भरती थांबवल्यामुळे देशातील तरुणांमध्ये संताप असून त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवडणूक रॅलीतही आपला विरोध व्यक्त केला आहे. अनेकवेळा भरती मेळाव्याअभावी सोशल मीडियावर अनेक मोहिमा झाल्या आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com