करिअरनामा ऑनलाईन । कुटुंबाला कोरोनासारख्या महामारीनं गाठलं असतानाही हार (MPSC Success Story) न मानता स्वतःचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मिरजच्या प्रमोद चौगुले याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हालाकीच्या परिस्थितीत प्रचंड मेहनत करून प्रमोद चौगुलेने यशाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाचं राज्यभरातून कौतूक होत आहे. या परीक्षेत 612 गुण मिळवून प्रमोद चौगुले हा संपूर्ण राज्यात प्रथम आला आहे. MPSC ने जाहीर केलेल्या अंतिम निकालात प्रमोद चौगुले याने बाजी मारली आहे. प्रमोदचा इथपर्यंतचा प्रवास हा भारावून टाकणारा आहे.
वडील टेम्पो चालक तर आई करते शिवणकाम
प्रमोद हे मूळचे मिरज तालुक्यातील सोनी या गावचे आहेत. ते विवाहित असून त्यांना एक मुलगी देखील आहे. तसेच प्रमोद यांचे वडील टेम्पो चालक आहेत तर आई शिवणकाम करते. घरी अर्धा एकर शेती. प्रमोदचं प्राथमिक शिक्षण हे सोनी गावातच झालं. त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी त्याला नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. अशा हालाकीच्या परिस्थितीत प्रचंड मेहनत करून प्रमोद चौघुलेने यशाला गवसणी घातली आहे.
अभ्यासासाठी कुटुंबापासून लांब (MPSC Success Story)
प्रमोदला आधीपासूनच MPSC आणि UPSC परीक्षा देण्याची इच्छा होती. त्यादृष्टीने त्याने अभ्यास करण्यास सुरुवात केली. अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी प्रमोद आपल्या पत्नीला आणि मुलीला सोडून पुण्यात राहू लागला. पुण्यात राहूनच त्याने MPSC च्या परीक्षेची तयारी केली.
पुराच्या पाण्याने आणि कोरोनाने कुटुंबाला घेरले
गेल्यावर्षी सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांच संपूर्ण घर होतं. तसंच कोरोनाकाळात त्याच्या कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं. मात्र या कठीण परिस्थितीमधूनही मार्ग काढत प्रमोदने अभ्यास सुरूच ठेवला आणि MPSC परीक्षेत बाजी मारली. यामुळे प्रमोदचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. या संपूर्ण प्रवासात त्याला कुटुंबाची मोलाची साथ मिळाली.
केवळ 1 मार्काने संधी हुकली
2015 पासून प्रमोद याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. यश – अपयशाचा लपंडाव सुरूच होता. गेल्यावर्षी केवळ १ मार्काने त्याची संधी हुकली आणि प्रमोदला अधिकारी पदापासून दूर रहावे लागले. तरीही हार न मानता प्रमोदच्या अभ्यास सुरूच होता. आता तर तो थेट राज्यातून पहिला आला आहे. (MPSC Success Story)
“हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता…”
कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हाच त्यांच्या घरचे सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. अशा परिस्थितीत प्रमोद एकटा अभ्यास करत होता. बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्याने हे यश मिळवलं आहे.
दरम्यान, कोव्हिड साथीमुळे MPSC च्या प्राथमिक परीक्षेला विलंब झाला होता. (MPSC Success Story) त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता. मात्र, राज्य लोकसेवा आयोगाने त्यानंतर वेगाने पावले टाकली. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा संपली. एप्रिलमध्ये मुलाखती पार पडल्या. मुलाखतींनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल लागण्याची परंपरा होती. ती परंपरा आयोगाने खंडीत करत मुलाखत संपता क्षणीच निकाल जाहीर केला आहे. निकाल जाहीर होताच प्रमोदच्या मित्राने त्याचं जल्लोषात स्वागत केलं.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com