HSC Board Exam Results 2022 : लवकरच जाहीर होणार 12 वीचा निकाल!! ‘या’ आहेत वेबसाईट्स; पहा सविस्तर…

HSC Board Exam Results 2022
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. (HSC Board Exam Results 2022) त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेचा विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगत आहोत हे निकाल कुठे आणि कसे बघायचे…

बारावीचा निकाल नक्की कुठे बघायचा? कोणत्या वेबसाईट्सवर हा निकाल दिसू शकेल? आणि निकाल बघण्यासाठी नक्की कोणती प्रक्रिया आहे? असे प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडू लागले आहेत. यासाठी आम्ही तुम्हाला बारावीचा निकाल बघता येईल अशा वेबसाईटची यादी आणि निकाल बघण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगत आहोत.

‘या’ वेबसाईट्सवर बघता येईल निकाल –

  1. https://hscresult.11thadmission.org.in
  2. https://msbshse.co.in
  3. hscresult.mkcl.org
  4. mahresult.nic.in

असा चेक करा निकाल – (HSC Board Exam Results 2022)

  1. mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Home Pageवर, बारावीच्या निकालाच्या Linkवर click करा.
  3. तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  4. “निकाल पहा” बटणावर click करा.
  5. महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / बारावीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
  6. भविष्यातील वापरासाठी Save करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com