करिअरनामा आॅनलाईन : मी माझं इथून पुढचं आयुष्य गरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी समर्पित करणार असल्याची घोषणा रतन टाटा यांनी केली आहे. आसाम येथील एका कार्यक्रमात बोलताना टाटा यांनी याबाबत आपलं मत जाहीर केलं आहे. नुकतेच आसाम येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सात कॅन्सर रुग्णालयांचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाला रतन टाटा हे सुद्धा उपस्थित होते. सरकारच्या या रुग्णालयांच्या उभारणीत टाटा यांचेही योगदान आहे.
रतन टाटा यांच्या आसाम येथील भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी थरथरत्या आवाजात टाटांनी लोकांशी संवाद साधला. आसामच्या दिब्रुगडमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींसह दिग्गज उद्योगपती रतन टाटा मंचावर उपिस्थत होते.
म्हातारपणामुळे टाटा कसेतरी निवेदकाच्या मदतीने स्टेजवर आले. ते कसेबसे माईकपर्यंत पोहोचले. मला हिंदीत भाषण कसे करायचे हे माहित नाही, त्यामुळे मी इंग्रजीत बोलेन असं म्हणत टाटा यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. काही वेळ इंग्रजीत बोलल्यानंतर रतन टाटा स्वतःला रोखू शकले नाहीत. नंतर ते हिंदीत बोलू लागले. वाढत्या वयामुळे त्यांच्या आवाजात थरथर जाणवत होती.
रतन टाटा पुढे म्हणाले, “आज आसाममध्ये कर्करोग रुग्णालये सुरू होत आहेत. हा दिवस राज्याच्या इतिहासातील एक मोठा दिवस आहे. आज आसाम जगाला सांगू शकते, की भारताचे एक छोटे राज्य कर्करोगावार मात करू शकते.” यावेळी पंतप्रधान मोदी टाटांची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकताना दिसले.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com