करिअरनामा आॅनलाईन I CSE बोर्डाच्या इयत्ता 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा सोमवार, 25 एप्रिल 2022 पासून सुरू होत आहेत. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे लवकरच दिली जाणार आहेत. परीक्षेला खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि विद्यार्थी अद्याप त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत आहेत. प्रवेशपत्रे CISCE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, cisce.org वर जारी केली जातील असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थी त्यांचे नाव आणि जन्मतारीख यांच्या मदतीने आपले परिक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील असं बोर्डाने सांगितले आहे.
ICSE, ISC टर्म 2 प्रवेशपत्र 2022 डाउनलोड कसे करायचे?
Step 1: उमेदवार अधिकृत वेबसाइट cisce.org वर लॉग इन करतील.
Step 2 : होमपेजवर, तुम्हाला अॅडमिट कार्ड लिंकवर जावे लागेल.
Step 3: आता लॉगिन पृष्ठावर आपले तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
Step 4: लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि सबमिट करा.
Steo 5: अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
परिक्षेला जाताना विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाइन प्रवेशपत्राची प्रिंटआऊट घेऊन जावे लागणार आहे. वैध प्रवेशपत्र नसलेले विद्यार्थी परीक्षेला बसू शकणार नाहीत. इंडियन स्कूल सर्टिफिकेट, ISC इयत्ता 12 वी सेमिस्टर 2 ची परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होईल, तर इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) किंवा इयत्ता 10 वी सेमिस्टर 2 ची परीक्षा 25 एप्रिल 2022 पासून सुरू होईल. 10वीच्या परीक्षा 23 मे रोजी संपतील तर 12वीच्या परीक्षा 13 जून 2022 रोजी संपतील. परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे उमेदवारांना प्रवेशपत्रावरच उपलब्ध असतील. कोणत्याही अद्यतनांसाठी अधिकृत वेबसाइट cisce.org वर लक्ष ठेवा.