तुमच्या डोक्यात भन्नाट Start-up आयडिया आहे? पण पैेसे नाहीत? इथे मिळेल फंडींग

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | तरुणांनो तुम्हालाही उद्योजक व्हायचं आहे. तुमच्याकडे नवीन आयडिया आहेत पण ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आर्थिक अडचण येत आहे. तसेच योग्य मार्गदर्शन मिळतं नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी मोठी खूशखबर आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मंडी या हिमाचल प्रदेशातील संस्थेने विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला अर्ज करण्याची प्रक्रिया 01 एप्रिल पासून सुरु झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.

द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मंडी या संस्थेने मागील 5 वर्षांमध्ये 227 Start-up ला मार्गदर्शन केले आहे. त्यामधील 127 start-up ला आर्थिक मदतही केली आहे. ही संस्था start-up ला 50 लाखापर्यंत मदत करू शकते. तसेच 10 लाखापर्यंत Prototyping निधी देऊ शकते. तसेच Founder ला 30000/-प्रति महिना आर्थिक खर्चासाठी देते. तसेच तुमच्या Start – up ला गती देण्यासाठी संबंधित क्षेत्रातील Mentor मिळतील.

हा प्रोग्राम नवीन तंत्रज्ञानच्या निगडित असणाऱ्या आणि भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर वाढला पाहिजे अशा Start-up साठी आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना आपली आयडिया इन्स्टिट्यूट समोर आकर्षक पद्धतीने मांडायची आहे. त्यांना तुमची आयडिया आवडली तर ते तुमच्या start-up ला मदत करण्यास तयार होतील.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा – click here

अधिकृत वेबसाईट – iit mandi.ac.in

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com