करिअरनामा ऑनलाइन | राज्यातील सर्व शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सुट्यांनंतर 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच विदर्भातील शाळा वाढत्या उन्हामुळे 27 जून पासून सुरू होतील. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. (School Holiday)
या निर्णयानुसार सोमवार 2 मे, 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. 12 जून, 2022 पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन 2022-23 मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि. 13 जून, 2022 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. 27 जून, 2022 रोजी सुरू होतील. (School Holiday)
उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ सारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन शिक्षणाधिकार्यांच्या परवानगीने करण्यात यावे मात्र माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी असेही शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.
स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट